मुंबई : बाहुबली आणि बाहुबली 2 सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता एसएस राजामौली यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. एसएस राजामौली यांचा आज वाढदिवस आहे. ज्यांनी आपल्या दमदार चित्रपटांनी लोकांच्या हृदयावर राज्य केलं. 10 ऑक्टोबर 1973 रोजी जन्मलेल्या राजमौली यांचं प्रोफेशनल लाइफ नेहमीच चर्चेत राहिलं आहे. मात्र त्यांचं वैयक्तिक आयुष्य अनेकदा प्रसिद्धीपासून आहे. आज आम्ही तुम्हाला राजामौली यांच्या लव्ह लाईफ सांगणार आहोत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसएस राजामौली यांच्या पत्नीचं नाव रामा राजमौली असं आहे. ती प्रसिद्ध चित्रपट व्यक्तिमत्त्वांच्या कुटुंबातून येते. फार कमी लोकांना माहित आहे की, राजमौलीशी लग्न करण्याआधी त्यांची पत्नी रामाचा घटस्फोट झाला होता. एवढंच नाही तर ती राजमौलीपेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे.
 



असं म्हटलं जातं की, जेव्हा राजमौली पहिल्यांदा रामाला भेटले तेव्हा तिचं लग्न झालं होतं आणि तिला एक मुलगा होता. दोघांची लव्हस्टोरी खूप फिल्मी आहे. रमा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एमएम कीरवानी यांची पत्नी श्रीवल्लीची धाकटी बहीण आहे. एक काळ होता जेव्हा रामाचं वैवाहिक आयुष्य विस्कळीत होत होतं. आणि तिने तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. या दरम्यान, राजमौली तिच्यासोबत होते आणि 2001 मध्ये त्यांनी रामाला प्रपोज केलं. यानंतर दोघांनी त्याच वर्षी लग्न केलं.