मुंबई : सुशांत सिंह राजपूत sushant singh rajput आत्महत्या प्रकरणी जोडल्या गेलेल्या ड्रग्ज तपासामध्ये गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडून चौकशी सत्र सुरु करण्यात आली आहेत. सुशांतच्या संपर्कात असणाऱ्यांपासून ते अगदी त्याची प्रेयसी rhea charaborty  रिया चक्रवर्तीच्या कुटुंबापर्यंत अनेकांचीच याअंतर्गत चौकशी करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील दोन दिवसांपासून रियाचीही एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. मंगळवारचा रियाची चौकशी होण्याचा हा तिसरा दिवस. चौकशीच्या याच सत्रांतून समोर आलेल्या माहितीनुसार आता रियानं एका महत्त्वाच्या गोष्टीची कबुली दिली आहे. आपण BUD ने भरेलली सिगरेट ओढायचो हे तिनं कबुल केल्याचं म्हटलं जात आहे. याचा अर्थ रिया गांजाची सिगरेट ओढत होती. सुशांतसोबत ही सिगरेट ओढत असल्याची कबुली तिनं दिली. 


रियाच्या घरातून ताब्यात घेण्यात आलेल्या काही उपकरणांमुळं हा खुलासा होऊ शकता आहे. एनसीबीनं रियाच्य घरातून तिचा जुना मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब अशा गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. ज्यांच्या फॉरेंसिक चाचणीत ही माहिती समोर आली. 


'या' काळात होती जास्त सक्रिय....


रियाच्या घरातून मिळालेल्या या सामानातून ही बाब स्पष्ट होत आहे की अंमली पदार्थांच्या आहारी गेलेली ही मंडळी २०१७-१९ या काळात अधिक सक्रिय होती. ज्यांच्याविषयीची धक्कादायक माहिती एनसीबीसमोर आली आहे. व्ह़ॉट्सअप चॅट, मेसेज यांच्या माध्यमातून मिळालेली माहिती पाहता यामध्ये ब़ॉलिवूडमधील काही मोठ्या कलाकारांची नावंही समोर येत आहेत. त्यामुळं येत्या काळात एनसीबीच्या निशाण्यावर आता बी- टाऊनची ही मंडळीही दिसू शकतात. 


 


अटकेच्या कारवाईची शक्यता 


ड्रग्ज प्रकरणी दिलेल्या या कबुलीनंतर आणि समोर येणाऱ्या धक्कादायक माहितीनंतर आता रिया चक्रवर्तीवर अटकेची कारवाई करण्यात येण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, सुशांतही २०१६ पासून ड्रग्ज घेत होता अशी धक्कादायक माहिती रियानं दिली. युरोप दौऱ्याहून परतल्यानंतर सुशांत हा रियाच्या घरी थांबला होता, तिथं ड्गर्ज पुरवण्यात आले होते. शिवाय मुंबईत तो ज्या हॉटेलमध्ये थांबत होता, तिथेही ड्रग्ज पुरवेल जात होते. ज्यासाठी सुशांतच्याच पैशांचा वापर केला जात होता याविषयीचे प्रश्न विचारले असता त्यावर मात्र रियाकडून फार माहिती मिळू शकलेली नाही. 


चौकशीमध्ये रियानं जवळपास ८० टक्के प्रश्नांची उत्तरं देत अनेग गोष्टी कबुल केल्याचं कळत आहे. तिनं ज्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत त्याचा अर्थ तिनं आरोप एका अर्थी कबुल केले असा होतो.  त्यामुळं या मुद्द्यांच्या आधारे तिला अटक केली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे.