मुंबई : शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB)ड्रग्ज प्रकरणी करनजीतला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, KG या नावाने ओळख असलेला करनजीत एक ड्रग्ज सप्लायर आहे. जो कॅपरी आणि लिटील हाइट्स ड्रग्ज विकत होता. करनजीत शौविक आणि स्मॅम्युअल मिरांडाला ड्रग्ज सप्लाय करत असल्याचीही माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली. यावेळी रियाने अनेक खुलासे केले असून बॉलिवूडमधील काही बड्या सेलिब्रिटींची नावंही पुढे आली आहेत. 25 बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्स प्रकरणी एनसीबीच्या रडारवर असल्याची सुत्रांची माहिती आहे. एनसीबी, काही बॉलिवूड सेलिब्रिटींना चौकशीसाठी समन्स पाठवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


रियाने ड्रग्ज प्रकरणात 5 बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं घेतली आहेत. त्यात अभिनेत्री सारा अली खानचं नाव घेतल्याची माहिती आहे. त्याशिवाय रकुल प्रीत सिंह, डिझायनर सीमोन खंवाटा, सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण आणि रेनड्रॉप मीडियाची फाऊंडर रोहिणी अय्यर, दिग्दर्शक मुकेश छाब्रा या पाच जणांच्या नावांचा समावेश आहे. 


दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput)आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या रिया चक्रवर्तीचा (Rhea chakraborty) जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. रियासह तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत, जैद आणि बासित अशा सहा जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.


सुशांत सिंह राजपूत प्रकरणी रिया चक्रवर्तीच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतानाच दिसत आहे. सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज आणून देण्यामध्ये आपली भूमिका असल्याची कबुली रियाने एनसीबीला दिली होती. तसंच ड्रग्जबाबतचं चॅटही आपलंच असल्याची माहितीही रियाने दिली होती.