मुंबई : बॉलिवूडचा लाडका दिवंगत स्टार सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला आज 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र त्याचे चाहते आजही त्याला आणि त्याच्याशी निगडित आठवणी विसरू शकलेले नाहीत. दोन वर्षांपूर्वी याच दिवशी आलेल्या त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडलं. 'पवित्र रिश्ता' या दैनिक शोमधून घराघरात नाव कमावणाऱ्या मानव आणि अर्चना या जोडीचे चाहते होते. त्यांचा ऑनस्क्रीन रोमान्स पाहण्याची संधी चाहत्यांना पुन्हा एकदा मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूट्यूबवर रिलीज झालेलं गाणं
सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचा एक म्युझिक व्हिडिओ यूट्यूबवर ट्रेंड करत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. चाहते यूट्यूबवर पुन्हा पुन्हा हे गाणं ऐकत आहेत आणि ओल्या डोळ्यांनी सुशांतला आठवत आहेत. सुशांत आणि अंकिताचे हे रोमँटिक गाणं त्यांच्या प्रसिद्ध शो 'पवित्र रिश्ता' मधील आहे. ज्याला चाहत्यांनी पसंती दिली आहे.



'जैसी हो वैसी रहो'मध्ये अंकिता आणि सुशांत रोमान्स करताना दिसले
यूट्यूबवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ गाण्यात  मानव आणि अर्चनाच्या अवतारात दिसत आहेत. 'जैसी हो वैसी रहो' असं या गाण्याचं शीर्षक आहे.