मुंबई : मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अनोख्या शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता अविनाश खर्शीकर यांचं गुरुवारी निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यामुळं त्यांचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी या अभिनेत्यानं अखेरचा श्वास घेतला. ते ६८ वर्षांचे होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९७८ मध्ये 'बंदिवान मी या संसारी' या चित्रपटातून त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं होतं. 'माझा नवरा तुझी बायको', 'बाप तशी पोरं', 'माफीचा साक्षीदार', 'घायाळ' अशा अनेक चित्रपचांमध्ये काम केलं होतं. त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांची विशेष मनं जिंकली. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी रंगभूमीही गाजवली होती. 'सौजन्याची ऐशी तैशी', 'वासूची सासू', 'लफडा सदन' या आणि अशा अनेक नाटकांमध्येही त्यांनी भूमिका साकारत प्रेक्षकांची दाद मिळवली होती. 


 


मराठी चित्रपट जगतामध्ये खर्शीकर यांच्या निधनानंतर चाहते आणि त्यांच्या कालाकार मित्रांनी दु:ख व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. एक देखणा अभिनेता आणि तितकाच चांगला व्यक्ती गमावल्याचीच खंत अनेकांच्या मनात होती.