Raju Srivastava यांच्या प्रकृतीबद्दल 24 दिवसांनंतर मोठी Update समोर
स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या 24 दिवसांपासून रुग्णालयात आहेत, त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी Update
मुंबई : स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या 24 दिवसांपासून ( Raju Srivastava hospitalized) रुग्णालयात आहेत. मात्र त्यानंतरही श्रीवास्तव यांची प्रकृती (Raju Srivastav Health Update) अजूनही नाजूकच आहे. कॉमेडी स्टारच्या प्रकृतीबाबत कुटुंबियांकडून सातत्याने माहिती दिली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला चाहते आपल्या लाडक्या अभिनेता आणि कॉमेडी स्टारच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा आरोग्याबाबत नवी माहिती समोर आली आहे.
एम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना संसर्ग आणि तापाच्या तक्रारी आल्यानंतर विशेष दक्षता घेण्यात येत आहे. राजू अद्यापही व्हेंटीलेटरवर आहेत. त्यामुळे त्यांनी नळीद्वारे पाणी किंवा रस दिला जात आहे.
कुटुंबियांची सहमती, डॉक्टरांचा निर्णय (Family consent, doctor's decision)
कुटुंबियांच्या सहमतीनंतर श्रीवास्तव यांना भेटायला कोणीच जाणार नाही, असा निर्णय डॉक्टरांनी खबरदारी म्हणून घेतला आहे. याशिवाय काही नातेवाईकांचे ऑडियो मेसेज श्रीवास्तव यांना ऐकावले जात आहेत. त्यामुळे श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका (Raju Srivastava suffered a heart attack) आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर गेल्या 10 ऑगस्टपासून राजू श्रीवास्तव हे व्हेंटिलेटर आहेत. राजू यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करतायेत.