Arhaan Khan Rasha Thadani Video : बॉलिवूडचे स्टारकिड्स हे सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. एकीकडे अनेक स्टारकिड्स हे बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहेत. अशातच आता बॉलिवूडचे दोन प्रसिद्ध स्टारकिड्स एकत्र फिरताना दिसले आहेत. हे स्टार किड्स दुसरे तिसरे कोणी नसून बॉलिवूड अभिनेता अरबाज खानचा मुलगा अरहान आणि अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थंडानी हे आहेत. सध्या राशा थंडानी आणि अरहान खानचा एकत्र फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे ते रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडचा निर्माता आणि अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोराचा मुलगा अरहान हा कायमच चर्चेत असतो. नेटकरी त्याची एक झलक पाहण्यासाठी फारच उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी अरहान हा पापाराझींसोबत मस्करी करताना दिसला होता. त्यानंतर आता अरहानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात तो चक्क अभिनेत्री रवीना टंडन आणि उद्योगपती अनिल थडानी यांची मुलगी राशा थडानीसोबत फिरताना दिसत आहे. 


अरहान खान-राशाचा नवा व्हिडीओ पाहिलात का?


या व्हिडीओत अरहान हा रस्त्यावर चालताना दिसत आहे. तर त्याच्या पाठीमागून राशा चालत असल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर ते दोघेही एकत्र गाडीत जाऊन बसतात. गाडीत बसल्यानंतर अरहान हा राशाशी काहीतरी बोलत हसताना दिसत आहे. यानंतर तो ड्रायव्हरला गाडी चालवण्यासाठी सांगतो. त्यांचा हा व्हिडीओ मुंबईतील वांद्रे परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी राशाने पिवळ्या रंगाचा वनपीस परिधान केला आहे. तर अरहानने पांढऱ्या रंगाचे टीशर्ट आणि काळ्या रंगाची ट्राऊजर परिधान केली आहे. 


राशा आणि अरहानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यापूर्वीही राशा आणि अरहानचा एकत्र व्हिडीओ व्हायरल झाला होता. अरबाज खान आणि शूरा खानच्या लग्नावेळी अरहान आणि राशाने एकत्र फोटोंसाठी पोज दिली होती. त्यानंतर ते दोघेही रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 



रवीना टंडनचे अरबाज खानसोबत खूप चांगले बॉन्डिंग आहे. अरबाज आणि शूराच्या लग्नातही रवीना टंडन, राशा थडानी सहभागी झाले होते. त्यामुळे आता आई -वडिलांप्रमाणेच राशा आणि अरहानमध्येही चांगले बॉन्डिंग असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच त्या दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याचेही बोललं जात आहे. पण अद्याप त्या दोघांनीही यावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही.