मुंबई : बदलते भारत की नई सोच, असं म्हणत सध्या 'शार्क टँक इंडिया' (Shark Tank India )हा कार्यक्रम चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. कार्यक्रम चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या माध्यमातून अनेकद नवउद्योजकांच्या स्वप्नांना भरारी घेण्याचं सामर्थ्य अर्थात आर्थिक मदत आणि कमालीचा आत्मविश्वास इथे दिला जात आहे. हे करण्यासाठी इथं 'शार्क्स' म्हणून काही माणसं बसली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या क्षेत्रात, उद्योगार उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या मंडळींची कर्तबगारीही तितकीच मोठी आहे. परीक्षकाच्या भूमिकेत असणाऱ्या 7 जणांपैकी 3 व्यावसायिका या महिला आहेत. 


एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीलाही लाजवेल असं त्यांचं रुप, श्रीमंती आणि हुशारी आहे. 


पाहताना या कोणी अभिनेत्री आहेत का, असंच प्रथमदर्शनी वाटतं. पण, त्यांची पदं आणि त्यांनी केलेली कामं पाहून आपण थक्क होतो. 


या सुपरवुमची नावं आहेत, Emcure Pharmaceutical च्या  नमिता थापर, Sugar कॉस्मेटिक्सच्या कार्यकारी संचालिका आणि संस्थापिका विनिती सिंग आणि मामा अर्थच्या संस्थापिका आणि अध्यक्षा गझल अलघ. 


नमिता थापर या Emcure Pharmaceutical च्या संचालिका आहेत. पुण्यात स्थित असणऱ्या या कंपनीच्या सीएफओ पदी त्या वयाच्या 44 व्या वर्षी नियुक्त झाल्या. 


निती आयोगाच्या महिला उद्योग विभाग, डिजिटल टास्क फोर्स आणि चॅम्पियन्स ऑफ चेंजसह इतरही बऱ्याच गोष्टींशी त्या जोडल्या गेल्या आहेत. 



दिल्लीत जन्मलेल्या विनीता सिंग या सुगर कॉस्मेटिक्स या सौंदर्य प्रसाधनांच्या कंपनीच्या संस्थापिका आणि कार्यकारी अध्यक्षा आहेत. त्यांचं वार्षिक उत्पन्न 300 कोटी रुपयांच्या जवनळपास सांगण्यात येत आहे. 


व्यवसायासोबतच आयआयटी मद्रासमधून शिक्षण घेतलेल्या विनिता या सायकलिंग, स्विमिंग अशा क्षेत्रांतही स्वारस्य दाखवतात. 



शिल्पा शेट्टी जाहिरात करते त्या मामा अर्थ या ब्रँडशी गझल अलघ यांचं नाव जोडलं गेलं आहे. शार्क टँक इंडियातील सर्वात तरुण परीक्षिका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 



काय आहे शार्क टँक इंडिया? 


Shark Tank India कार्यक्रम सध्या बराच गाजतोय. यामध्ये गुंतवणुकदारांचं एक पॅनल आहे. ज्यांना शार्क म्हणून संबोधण्यात येतं. 


या शार्क्ससमोर नवउद्योजक येतात आणि त्यांच्या कल्पना, उत्पादन वस्तू सादर करतात. ज्यांचं सादरीकरण, ज्यांची उत्पादनं या गुंतवणूकदारांना पटतात, त्यामध्ये ते मोठी रक्कम गुंतवतात.