मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे. सध्या त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. परंतु अद्यापही त्याच्या आत्महत्येमागचे ठोस कारण समोर आलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येबाबतीत आतापर्यंत ३५ जबाब नोंदवण्यात आले आहेत. आता वांद्रे पोलिसांनी दिग्दर्शक आदित्य चोप्रांचा जबाब नोंदवला आहे. तब्बल चार तासांच्या या प्रक्रियेनंतर ते पोलीस स्थानकाबाहेर आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चौकशी  दरम्यान पोलिसांनी आदित्य चोप्रांकडे 'पानी' चित्रपट आणि सुशांतमध्ये झालेल्या यशराज फिल्म करारासंबंधित विचारणा केली. सध्या बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा वाद तुफान रंगत आहे. १४ जुलै रोजी त्याने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. 



अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर वादाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.  सुशांतची  आत्महत्या नव्हे तर हत्या आहे आणि ही हत्या बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीमुळे झाली असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 


सुशांतच्या आत्महत्येनंतर वरूण धवन, आलिया भट्ट, सोनम कपूर यांसारख्या स्टारकिड्सवर टीका होत आहे. शिवाय या ट्रोलींगला कंटाळून काही स्टारकिड्सने आपले ट्विटर अकाऊंट देखील डिलीट केले आहेत.