छोट्या भावामुळं तैमुरचा जळफळाट? तो म्हणतो...
करीना कपूर खानचा मोठा मुलगा तैमूर अली खान त्यांच्या फॅमेलीमध्ये खूप लाडका आहे.
मुंबई : करीना कपूर खानचा मोठा मुलगा तैमूर अली खान त्यांच्या फॅमेलीमध्ये खूप लाडका आहे. केवळ त्यांचं कुटुंबच नाही तर त्याला लहानपणापासूनच माध्यमांकडून देखील खूप प्रेम दिलं जात. आता त्यांच्या घरी एक नवीन पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे तैमूरला त्यांचा हेवा वाटतो का? तैमुरची आई करीना कपूरने खुलासा केला आहे की, ती लहान भाऊ जेहवर कशी प्रतिक्रिया देतो आणि तो त्याच्या मित्रांना जहांगीरबद्दल काय सांगतो.
सैफ आणि करीना घाबरले होते ...
करीना कपूर खानचा मोठा मुलगा तैमूरचा जन्म 2016 मध्ये झाला. तैमूर 4 वर्षांचा आहे. आता त्याचा लहान भाऊ जहांगीर त्याच्या घरी जन्मला आहे. अशा परिस्थितीत तैमूरला तिचा हेवा वाटतो का? करीना कपूरने दिलेल्या एका मुलाखतीत याचं उत्तर दिलं. आणि करीना म्हणाली, "सुरुवातीला सैफ आणि मी थोडी घाबरलो होतो की, तैमूर कदाचित जेहचा हेवा करेल किंवा त्याला असं वाटेल की, घरात कोणीतरी नवीन आलं आहे. पण तैमूर अप्रतिम आहे, किंबहुना तो त्याच्या भावाचा संरक्षक आहे. तो खूप आनंदी आहे.
तैमुर मित्रांना भावाची करून देतो ओळख
करीना म्हणते, जेव्हा त्याचे दोन, तीन मित्र येतात, तो म्हणतो, तू माझा भाऊ पाहिलास का? तुम्ही त्याला पाहिलं का, त्याला नमस्कार? तो हे सर्व त्याच्या मित्रांना विचारतो. करीनाने नुकतंच तिचे पुस्तक लाँच केलं आहे. या पुस्तकात तिने तिच्या दोन्ही गर्भधारणेशी संबंधित समस्या आणि अनुभव लिहिले आहेत.