मुंबई : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या असू सालेमची एक्स गर्लफ्रेन्ड मोनिदा बेदीचा काल ४३वा वाढदिवस झाला. मोनिकाचा जन्म १८ जानेवारी १९७५ मध्ये छब्बेवाल(पंजाब)मध्ये झाला होता. यानिमित्ताने तिच्या जीवनाशी निगडीत काही इंटरेस्टींग गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. खासकरून तिचं अबू सालेमसोबत अफेअर कसं सुरू झालं हे जाणून घेऊया....


स्टेज शोमध्ये झाली होती भेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, दोघांच्या पहिल्या भेटीतच मोनिका बेदी अबू सालेमवर फिदा झाली होती. एका स्टेश शो दरम्यान दोघांची भेट झाली होती. मोनिकानुसार, सालेमच्या बोलण्याच्या स्टाईलने ती इंम्प्रेस झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. मोनिका अनेक वर्ष त्याच्यासोबत होती. इतकेच काय तर जेव्हा सालेमला पोर्तुगालमधून अटक करण्यात आली तेव्हा ती त्याच्यासोबतच होती. 


मोनिकाने सांगितले होते वाईट अनुभव


अटक झाल्यानंतर मोनिकाने तिच्या जीवनाशी निगडीत अनेक अनुभव सांगितले होते. त्यावर तिने एक शायरी सुद्धा लिहिली होती. ‘छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए, ये मुनासिब नहीं आदमी के लिए, प्यार से भी जरूरी कई काम हैं, प्यार सब कुछ नहीं जिंदगी के लिए।’.


फोनवर बोलण्याचा सिलसिला...


स्टेश शो दरम्यान सालेमने तो एक उद्योगपती असल्याचं सांगितलं होतं. मोनिकानुसार सालेम स्टेज शोआधी नावं बदलून बोलत होता. पण त्याचा बोलण्याचा अंदाज असा काही होता की, पहिल्याच भेटीत तिला तो पसंत आला होता. मोनिकाने सांगितले होते की, फोनवर आम्ही बोलत होतो, पण मला वाटत होतं की, आम्हा दोघांमध्ये नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे. 


ती सांगते की, मी कधीही विचार केला नव्हता की, एखाद्या व्यक्तीसोबत फोनवर बोलता बोलता मी त्याला पसंत करू लागेल. मी हे  नाही म्हणणार की, मी त्याच्या प्रेमात पडली होती. पण मी त्याला पसंत करत होती. 


कधीही खरं नाव सांगितलं नाही


मी त्याच्या फोनची दिवसभर वाट बघत बसायची आणि फोन न आल्यावर मी नाराज व्हायची. फोनवर बोलताना सालेम मला खूप चांगला आणि समजदार व्यक्ती वाटला होता. तो माझा खूप क्लोज फ्रेन्ड असल्यासारखा वाटत होता. त्याच्याशी मी सगळ्याच गोष्टी शेअर करायची. 
 
दुबईमध्ये दोनदा भेटल्यानंतर मी मुंबईला परत आल्यावर मी अबूला मुंबईला येण्यास सांगितले. पण तो नेहमीच कारणं सांगत होता. अबूने त्याचं नाव मला आर्सलन अली सांगितलं होतं. अबू नेहमी हेच नाव वापरत होता. इतकेच काय तर पोर्तुगालमध्ये आम्हाला अटक झाली तेव्हा अबूने आपलं नाव आर्सलन अली सांगितलं होतं. 


मोनिकाला दुबईला बोलवले


मी कधी मुंबईला परत जावं असं अबूला वाटत नव्हतं. त्यामुळे मी जेव्हाही मुंबईत असायची तो मला दुबईत येण्यास सांगत होता. आणि म्हणाला की, तू मुंबईत राहिलीस तर अडचणीत येशील. नंतर मी जेव्हा दुबईत गेली तेव्हा त्याने मला सांगितले की, मी आता मुंबईला परत जाऊ शकत नाही. तो मला म्हणाला की, जर मी मुंबईला परत गेली तर पोलीस तुला माझ्याबाबत माहिती विचारतील.  मला वाटले होते की, मी दोन आठवड्यांनी मुंबईत परत येईल. 


अबूला जगात काहीही ओळख असली तरी मी त्याच्यासोबत असेपर्यंत तो माझ्यासाठी एक सामान्य माणूसच होता. तो माझ्याशी चांगलं वागत होता. त्याने मला त्याच्याबाबत कधीही काहीही कळू दिले नाही. मी नेहमीच त्याला गरजूंची मदत करताना पाहिले आहे. मला त्याच्या भूतकाळाबद्दल काहीच माहिती नाही. 


२००६ मध्ये आला होता सिनेमा


अबू सालेम आणि मोनिका बेदीच्या लव्हस्टोरीवर २००६ मध्ये दिग्दर्शक अनुराग बासूने सिनेमा केला होता. या सिनेमात कंगणा राणावतने मोनिकाची भूमिका साकारली होती आणि शायनी आहुजाने अबू सालेमची भूमिका. हा कंगणाचा पहिलाच सिनेमा होता. यासाठी तिला अनेक अवॉर्ड मिळाले होते.