Aaj ki Raat Song Choreographer Arrested: स्त्री 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतो आहे. या चित्रपटाने जगभरात कमाई केली. प्रदर्शनाच्या 1 महिन्यानंतरही आजही हा स्त्री 2 चित्रपटगृहात आहे. यातील गाणीही लोकप्रिय झाली. पण या चित्रपटा संबंधीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. स्त्री 2 मधील फेमस 'आज की रात' या गाण्याच्या कोरिओग्राफरवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्त्री 2 चित्रपटातील आज की रात या गाण्याच्या कोरिओग्राफर जानी मास्टरवर पॉक्सो (Protection of Children from Sexual Offences Act– POCSO)अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली आहे. जानी मास्टर यांनी याआधी पुष्पा, बाहुबली या सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटाच्या गाण्यांसाठी कोरियोग्राफी केली आहे. जानी हा एक प्रसिद्ध कोरियोग्राफर असून त्याला त्याच्या कामासाठी राष्ट्रीय पुस्कारही मिळाला आहे. जानी मास्टर यांचे खरे नाव शेख जानी असे आहे.


21 वर्षीय तरूणीचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी अटक


जानी मास्टर यांच्यासोबत काम करणाऱ्या 21 वर्षाच्या एका तरूणीने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जानी आपला लैंगिक छळ करत असल्याचा खुलासा या तरूणीने केला आहे. या गंभीर आरोपानंतर पोलिसांनी जानी मास्टर यांना अटक केली आहे. मुलीने आपल्या सोबत घडलेल्या या गैरप्रकाराबद्दल हैदराबाद पोलिसांकडे तक्रार केली असून पोक्सो अंतर्गत या कोरिओग्राफरला अटक करण्यात आली आहे. 


नेमकं झालं काय?


कोरिओग्राफर जानी मास्टर यांनी आपल्या सोबत काम करणाऱ्या एका 21 वर्षीय तरूणीशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गुरूवारी या प्रकरणा संदर्भात पोलिसांनी माहिती दिली. त्या माहितीनुसार, जानी मास्टरला सायबराबाद पोलिसांनी गोव्यात अटक केली होती. आता त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यानंतर कोर्टाकडून ट्रान्झिट वॉरंट मिळाल्यानंतर त्याला हैदराबादला आणण्यात येणार आहे. 


जानी मास्टर यांच्यावरचा नक्की आरोप काय?


जानी मास्टर या तेलगू कोरिओग्राफरने आपल्या तालावर अनेक मोठ्या स्टार्सला नाचवले आहे. पण आता याला पोक्सो अंतर्गत अटक करण्यात आली आहे. जानी मास्टर सोबत काम करणाऱ्या तरूणीने सांगितले की त्यांने आऊटडोअर शूटच्या दरम्यान तिचा लैंगिक छळ केला. या तक्ररीची दखल घेऊन रायदुर्गम पोलिसांनी तिच्या तक्रारीच्या आधारे शून्य एफआयआर नोंदवला असून त्यानंतर जानी मास्टरला अटक करण्यात आली आहे.