'स्त्री' पेक्षा 'स्त्री 2' जास्त चर्चेत
स्त्री 2 या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता तीन आठवडे झाले असून, अमर कौशीक दग्दर्शित या विनोदी-भयपटाने बॉक्सऑफीसवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 2018 ला प्रदर्शित झालेल्या 'स्त्री' या गजलेल्या सिनेमाचा हा सिक्युअल आहे. 'स्त्री' सूद्धा फार नावाजला होता आणि आता त्याचा सिक्युअल त्याच्याहून जास्त प्रसिध्दी मिळवत आहे. चित्रपटातील श्रद्घा कपूर , राजकुमार राव, अपरशक्ती खुरणा, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॉनर्जी आणि इतर सर्वच कलाकारांना त्यांच्या भुमिकांसाठी प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटांचे बॉक्सऑफीस रेकॉर्डस् मोडले
15 ऑगस्टला 'स्त्री 2' दर्शकांच्या भेटीसाठी चित्रपटगृहात आला , येताच त्याने  बॉक्सऑफीसवर धुमाकूळ घातला. बऱ्याच चित्रपटांचे बॉक्सऑफीस रेकॉर्डस् मोडले. खास करून या तिसऱ्या आठवड्यात स्त्री 2 बॉक्सऑफीसवर उंची गाठत आहे. .या चित्रपटाने कमाईमध्ये शाहरुख खानचा 'जवान' , रणबीर कपूरचा 'अॅनिमल', एवढच नाही तर प्रभासचा 'बाहुबली 2' या सूपरहीट चित्रपटांना मागे टाकले आहे. 


बॉलीवुडचा नवा सूपरहिट 
तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने बॉक्सऑफीसवर तब्बल 70.20 कोटींची कमाई करण्याचा विक्रम केला आहे. राजकुमार रावच्या स्त्री 2 ने बॉलीवुडसमोर एक नवा सूपरहिट सिनेमा उभा केला आहे. 'जवान' ची 3ऱ्या आठवड्याची कमाई 52.06 कोटी तर, 'अॅनिमलची' 50.30 कोटी होती . प्रभासच्या 'बाहुबली 2' ने 69-75 कोटी तिसऱ्या आठवड्यात कमवले होते. तर 'गद्दार 2' ने 63.35 कोटीची कमाई केली होती.


22 दिवसांत 500 कोटी
असे सांगितले जात आहे की, जवान नंतर स्त्री 2 हा सेकंड-फास्टेस चित्रपट आहे, ज्याने 500 कोटी चा आकडा निव्वळ 22 दिवसांत गाठला. जवानने 18 दिवसात हा आकडा गाठला होता. एकंदर परिस्थिती बघता असे वाटते ,स्त्री 2 भारतातील सर्वात मोठा हिंदी सिनेमा बनण्याच्या मार्गावर आहे. कंगना राणावतचा 'एमर्जेंसी' हा सिनेमा या आठवड्यात प्रदर्शित होणार होता , पण काहीकारणास्तव तो पुढे ढकलला  गेला आहे .त्यामुळे स्त्री 2 ला स्पर्धा देण्यासाठी तसा कोणता चित्रपट सध्या चित्रपटगृहात नाही. स्त्री 2 चा मार्ग पुर्णपणे मोकळा आहे.