कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर :  झी मराठी वाहिनीवर सा रे ग म प लिटिल चॅम्पस् चं या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. या पर्वात अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील गौरी पगारे सा रे ग म प लिटिल चॅम्पसची महाविजेती ठरली आहे त्याबद्दल गौरीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले आहे.सुरेश वाडकर, सलील कुलकर्णी अशा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरीला सा रे ग म प ची महाविजेती म्हणून घोषित करण्यात आल्याने कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय (Sa Re Ga Ma Pa Li'l Champs Winner gauri pagare).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रहिवाशी गौरी पगारे गरीब कुटुंबातील असून अत्यंत खडतर परिस्थितीतून ती पुढे आली आहे.गौरी आईच्या पोटात असतानाच वडिलांची साथ सुटली. तिच्या आई अलका यांचा संघर्ष शब्दात मांडण्या पलीडकचा आहे. लहान वयातच गौरीने आपल्या मधुर आवाजाने सर्वांनाच भुरळ घातली.एक मोठी गायिका होण्याचं स्वप्न तिनं पाहिलं आणि ते साकार करण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केलीये. सारेगमप ची महाविजेती ठरल्याने तिने आनंद व्यक्त केला आहे.


गौरीच्या या संघर्षमय प्रवासात तिच्या आईची देखील तिला मोलाची साथ मिळाली असून शेतात मोल मजुरी करून आई प्रपंचाचा गाडा चालवतेय. गौरीला गायनासाठी कोणताही क्लास लावण्याची कुटुंबाची परिस्थिती नव्हती. गौरीने घरीच आपला छंद जोपासत गायनाचा सराव केला आणि थेट सा रे ग म प ची महाविजेती ठरली. 


तिने भविष्यातून ग्रामीण भागातून देखील कलाकार पुढे जाऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण समोर ठेवले गेले आहे.कला ही अधिक बिकट संघर्षातून फुलते आणि बहरते.गाणे गावे असे आपल्या सर्वांना वाटते पण तितका मंजुळ कंठ मिळणे ही ईश्वरीय देणं असावी लागते.गौरीच्या या आदर्शाने कोपरगावसह महाराष्ट्राची मान उंचावली गेली आहे.कलारत्नाची खान आपल्याकडे आहे मात्र त्यांना वाव आणि साथ मिळणे गरजेचे आहे.गौरीला आणि तिच्या कुटुंबाला माझ्याकडुन नेहमी सहकार्य असेल.तिच्या कलेचा आणि गुणवत्तेचा सन्मान हा आपल्यासाठीही भुषनावह बाब आहे.गौरी ही आपल्या कोपरगावच्या कलासंस्कृतीचा अलौकिक अलंकार आहे अशा भावना सर्वत्र झाल्या आहेत.कोपरगावचे राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे,युवानेते विवेक कोल्हे यांनीही गौरीचे अभिनंदन केले आहे.सर्व स्तरातून गौरीवर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे.