नवी दिल्ली : 'नगिन' आणि 'देवों के दे .... महादेव' यांसारख्या टीव्ही मालिकांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली आणि आपला खास असा चाहता वर्ग निर्माण केली अभिनेत्री मौनी रॉय हिच्यावर तिचे चाहते सध्या भलतेच खूश आहेत. खास करून सोशल मीडियातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या कौतुकाचे कारण म्हणजे तिने इस्टाग्रामवर शेअर केलेले तिचे काही खास फोटो. तसेही, इन्स्टाग्रामवर तिचा चाहता वर्ग मोठा आहे. सध्या ती कलर्स टीव्हीवरच्या एका मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या मालिकेत ती शिवांगी नावाच्या एका नागिनची भूमिका साकारत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मौनीच्या कारकीर्दीवर कटाक्ष टाकायचा तर, एकता कपूरच्या 'क्योंकी सांस भी कभी बहू थी' मालिकेतून २००७ पासून सुरूवात केली होती. त्यानंतर तिने दो सहेलिया आणि कस्तूरी यांसारख्या मालिकेतही काम केले होते. मात्र, तिला २०११मध्ये आलेल्या देवों के देव महादेव या मालिकेने प्रसिद्धी मिळवून दिली.