मुंबई : कायम आपल्या अभिनयाने अनेकांना घायाळ करणारा अभिनेता अक्षय कुमार आता मात्र  वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 'बच्चन पांडे' आणि 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमाच्या अपयशानंतर अक्षयचा 'रामसेतू' लवकरचं चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण सिनेमा प्रदर्शित होण्याआधीचं अडचणीत अडकला आहे.  सध्या अक्षयच्या 'राम सेतू' सिनेमावरुन वाद सुरु आहे. सिनेमा कायद्याच्या कचाट्यात सापडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एवढंच नाही सिनेमाची कथा आणि अक्षयवर तक्रार दाखर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत अक्षयवर संताप व्यक्त केला आहे. 'मी अभिनेता अक्षय कुमार आणि त्याच्या कर्मा मीडियावर गुन्हा दाखल करणार आहे, कारण त्याने त्याच्या राम सेतू सिनेमात चुकीची धारणा मांडली आहे, ज्यामध्ये राम सेतूची प्रतिमा खराब झाली आहे.'



एवढंच नाही तर, माझे वकील सत्य सभरवाल या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती देखीस  सुब्रमण्यम स्वामी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यात राम सेतूचे पोस्टर रिलीज करण्यात आलं.


पोस्टमध्ये अक्षय कुमार आणि जॅकलिन काहीतरी शोधताना दिसत होते. त्यांच्यासोबत सत्यदेवही होता. सिनेमा 2022 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.