मुंबई : आज अभिनेत्री शिबानी दांडेकर तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. अभिनेत्री शिबानीचा जन्म 27 ऑगस्ट 1980 साली झाली. काही दिवसांपुर्वी शिबानीने फरहान अख्तरसोबत लग्नगाठ बांधली. मात्र आज आम्ही तुम्हाला ही अभिनेत्री आई म्हणून कशी आहे याबद्दल सांगणार आहोत. फरहानला आधीच्या पत्नीपासून मुलं आहेत. आणि शिबानी त्यांची सावत्र आई आहे. मात्र ही सावत्र आई घरात तिच्या मुलांसोबत  कशी वागवते हे जाणून घेण्यात सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आज आम्ही तुम्हाला शिबानीचे आणि फरहानच्या मुलीचे असे काही फोटो दाखवणार आहोत जे पाहून शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांच्या मुलींमधील बॉन्डिंग स्पष्टपणे समजतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच फरहान अख्तरने सोशल मीडियावर एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. फरहानच्या या फोटोमध्ये त्याची दुसरी पत्नी शिबानी दांडेकर आणि मुली शाक्य अख्तर आणि अकिरा अख्तर एकत्र दिसत आहेत. या तिघांमध्ये आई-मुलीच्या पलीकडे चांगल्या मैत्रिणीसारखं बॉन्डिंग असल्याचं फोटो पाहिल्यानंतर स्पष्ट होतं.


शाक्य आणि अकिरा अख्तर या फरहान अख्तरची एक्स पत्नी अधुना भाबानी यांच्या मुली आहेत. या फोटोंमध्ये सर्वजण सेलिब्रेशनच्या मूडमध्ये एकत्र दिसत आहेत आणि खूप आनंदी दिसत आहेत. फरहान अख्तरचा भूतकाळ समजून घेऊन शिबानीने त्याच्याशी लग्न केलं आहे, अशा परिस्थितीत मुलींसह संपूर्ण कुटुंबाने शिबानीचं जोरदार स्वागत केलं होतं.


फरहानच्या या फोटोमध्ये त्याच्या मुली शाक्य अख्तर आणि अकिरा अख्तर खुर्चीवर बसलेल्या दिसत आहेत. तर फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर मागे उभे राहून स्माईल देताना दिसत आहेत. फरहान अख्तरचा हा फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. शिबानी फरहानची मोठी मुलगी शाक्यपेक्षा फक्त 20 वर्षांनी मोठी आहे.


खरंतर, लग्नाच्या 16 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर फरहान अख्तर आणि त्याची पहिली पत्नी अधुना भाबानी यांचा घटस्फोट झाला होता. दोघांनी 2017 मध्ये एकमेकांना घटस्फोट दिला. यानंतर गेल्या वर्षी फरहान अख्तरने शिबानी दांडेकरसोबत लग्न केलं.


फरहान अख्तर आपल्या मुलींसोबत दिसण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी. याआधीही फरहानचे मुली शाक्य अख्तर आणि अकिरा अख्तरसोबतचे फोटो समोर आले आहेत. फरहान अख्तरचा 'जी ले जरा लेके' हा चित्रपट येत्या काळात येणार आहे, या चित्रपटात बॉलिवूड सुपरस्टार कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा एकत्र दिसणार आहेत.