मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. ती कायम पर्यावरणाबद्दलचे विचार शेअर करताना दिसतो. अलिकडेच ती जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमात पर्यावरणाच्या आणीबाणीविषयी बोलताना तिचे आश्रू अनावर झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. दिया पर्यावरणप्रेमी असल्यामुळे ती अनेक उपक्रमांमध्ये उपस्थित असते. यावेळी पर्यावरणाबद्दल आपले विचार मांडताना ती अचानक रडू लागली.



ती म्हणाली, 'प्रत्येकाच्या वेदना त्रास समजून घ्या. कोणतीही गोष्ट नक्की समजून घ्या. हीच आपली खरी ताकद आहे. जसे आहात तसे राहा. हा कोणता परफॉर्मंन्स नाही.' असं बोलत असताना तिचे अश्रू अनावर झाले.  त्यानंतर तेथील एका व्यक्तीने डोळे पुसण्यासाठी तिला टिश्यूपेपर दिला. मात्र 'मला टिश्यूपेपर नको.' असं दिया म्हणाली. 


दिया पर्यावरणाबद्दल अत्यंत जागृत आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, प्रदुषण यांसारख्या पर्यावरणासाठी घातक असणाऱ्या गोष्टींवर ती कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार मांडते.