Sugandha Mishra Sanket Bhosale Baby : स्टँडअप-कॉमेडियन कपल सुगंधा मिश्रा आणि डॉ. संकेत भोसलेच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. लवकरच ही जोडी पालक बनणार आहे. लवकरच ते त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत करणार आहेत. काही काळापूर्वी अभिनेत्रीने तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करुन चाहत्यांना गरोदरपणाची गोड बातमी दिली होती. आता या जोडप्याने नुकतंच त्यांच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबीयांसोबत डोहाळे जेवणाचं आयोजन केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरोदर सुगंधा मिश्राचा बेबी शॉवर कार्यक्रम
डोहाळे जेवणाच्या या कार्यक्रमात या जोडीने महाराष्ट्रीयन परंपरचे पालन केलं, ज्यात बर्फी-पेढा, ओटी-भरणं आणि धनुष्यबाण यांसारख्या सर्व विधींचा समावेश होता. डायपर लवकरात लवकर कोण बदलेल असे काही मजेदार खेळही या कार्यक्रमात खेळले गेले. यावंर सुगंधा म्हणाली, 'डायपर बदलण्याची स्पर्धा मी जिंकली. संकेतने आणि मी एक गाणंदेखील सादर केलं.  जे मी लिहिलं होतं आणि आम्ही दोघांनी ते गायलं होते. त्याचं शीर्षक होतं 'एक नवीन पाहुणे येत आहे'.


हिरव्या रंगाच्या साडीत पतीसोबत बेबी बंप दाखवताना अभिनेत्री
बेबी शॉवरच्या निमित्ताने संकेत म्हणाला, 'आम्ही खूप मजा केली याचा मला आनंद आहे आणि सुगंधाला हसताना आणि कार्यक्रमाचा आनंद घेताना पाहून मला खूप बरं वाटलं. आता देवाच्या आशीर्वादाने लहान मुलाच्या लवकर आगमनाची आम्ही वाट पाहत आहोत.



यापूर्वी सुगंधाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही सुंदर फोटो शेअर केले होते ज्यात ती तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. या फोटोंमध्ये तिचा पती संकेतही तिच्यासोबत दिसत आहे. सुगंधाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती समुद्राच्या किनाऱ्यावर दिसत आहे. तिने तिच्या बेबी बंप शूटसाठी अभिनेत्रीने वाईन कलरचा हाय थाई स्लिट गाऊन घातला आहे. सुगंधा मिश्रा यांनी कॉमेडियन, अभिनेता आणि डॉक्टर संकेत भोसले याच्याशी २६ एप्रिल २०२१ रोजी लग्न केलं.