मुंबई : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आज अगस्त्य त्याचा २३ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म २३ नोव्हेंबर 2000 साली झाला. त्याच्या वाढदिवसानिमीत्त बच्चन कुटूंबीयांनी त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर दुसरीकडे शाहरुखची लेक सुहाना खानही चर्चेत असते. अनेकदा या दोघांचं नाव अनेकदा एकमेकांशी जोडलं गेलंय. सुहाना  सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. पण तुम्हाला माहितीये का? या दोघांचा एक फ्लाईंग किस व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा सुहानाला फ्लाईंग किस देताना दिसला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ समोर येताच या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चांनी जोर धरला होता. हा व्हिडीओ जरी आत्ताचा नसला तरी अगस्त्यच्या वाढदिवसानिमीत्त हा व्हिडीओ सोशल माडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ फॅशन डिझायनर तानिया श्रॉफच्या बर्थडे पार्टीतला आहे. तिथे बॉलिवूडच्या अनेक स्टार्सने  हजेरी लावली होती. समोर आलेल्या व्हिडीओत निर्वाण खान, अंजिनी धवन, सुहाना खान, अगस्त्य नंदा, आर्यन खान, खुशी कपूर, शनाया कपूर,  यांनी हजेरी लावली होती.  याच पार्टीतला सुहाना आणि अगस्त्यचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाा होता.


समोर आलेल्या या व्हिडीओत अगस्त्य तानियाच्या बर्थडे पार्टीतून निघताना दिसतोय त्याचबरोबर त्याच्यासोबत शाहरुखची लेकही दिसतेय. यानंतर तो सुहानाला तिच्या कारपर्यंत ड्रॉपही करताना दिसत आहे. त्याच्यासोबत अहान शेट्टी आणि तानिया सुद्धा दिसत आहेत. अगस्त सुहानाला कारमध्ये बसवतो आणि तिला फ्लाईंग किसही करतो. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. अनेकजणांनी त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं.


लवकरच या दोघांटचा डेब्यू सिनेमा 'द आर्चीज' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात खुशी कपूरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. झोया अख्तर दिग्दर्शित द आर्चीज' हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.