मुंबई : शाहरूख खानची मुलगी सुहाना खान अतिशय चर्चेत असलेली स्टारकिड. 22 मे रोजी सुहाना 21 वर्षांची झाली आहे. सुहाना प्रत्येक वेळी या ना त्या कारणाने चर्चेत असते. आज सुहानाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या वडिलांनी म्हणजे किंग खान शाहरूख खानने सुहानाला डेट करणाऱ्यासाठी तयार केलेले 7 नियम. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुहाना खान आपल्या वडिलांसोबत म्हणजे शाहरूख खानसोबत अनेकदा दिसली आहे. अनेकदा शाहरूख आणि सुहाना क्वालिटी टाइम घालवताना दिसतात. सुहानाच्या अभिनयाबाबत शाहरूख बाप म्हणून खूप स्पष्ट आहे. शाहरूख म्हणतो की, सुहानाला अभिनय करायचा आहे. पण तिने 3-4 वर्षे अजून अभिनयाचा अभ्यास करायला हवा. तसेच तिने पहिलं आपलं शिक्षण पूर्ण करायला हवं. 


तसेच शाहरूख आपल्या मुलीच्या खासगी आयुष्याबद्दलही स्पष्ट बोलला आहे. त्याने सुहानाला डेट करणाऱ्या व्यक्तीसाठी 7 नियम बनवले आहे. हे सात नियम फॉलो करूनच ती व्यक्ती सुहानाला डेट करू शकते. 


शाहरूखचा पहिला नियम आहे नोकरी. सुहानाला डेट करणाऱ्या व्यक्तीकडे नोकरी असणं आवश्यक आहे. त्याने काही तरी कामधंदा करणं अत्यंत आवश्यक आहे. 


शाहरूखचा दुसरा नियम आहे मी तुला पसंत करत नाही. 


शाहरूखचा तिसरा नियम आहे मी प्रत्येक जागी आहे. 


शाहरूखचा चौथा नियम आहे एक वकील ठेवणं गरजेचं आहे. 


शाहरूखचा पाचवा नियम आहे, ती माझी मुलगी आहे. 


शाहरूखचा सहावा नियम आहे, मला कारागृहात जायला काहीच हरकत नाही 


शाहरूखचा सातवा नियम आहे, तू सुहानासोबत जे काही वाईट करशील त मी तुझ्यासोबत करेन.