मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यामुळे जवळपास 1 महिना तुरुंगात होता. तेव्हा पूर्ण खान कुटुंब मोठ्या अडचणीत आलं होतं. पण आता खान कुटुंबात पुन्हा उत्साह साजरा होताना दिसत आहे. त्याला कारण देखील तसंच आहे. शाहरुख आणि गौरीची मुलगी सुहाना खानने आई-वडिलांना ताठ मानेनं जगण्याची संधी दिली आहे. सुहानाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुहाना लवकरचं 'द आर्चीज’ (The Archies) सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.  सिनेमा पूर्णपणे मैत्रीवर आधारित आहे. सिनेमातून अनेक नवीन चेहेरे समोर येणार आहेत. 


सिनेमात सुहाना शिवाय सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू  अगस्त्य नंदा आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘द आर्चीज’ मध्ये अगस्त्य नंदा - आर्ची एंड्रयूज, खुशी कपूर - बेट्टी कपूर आणि सुहाना खान - वेरोनिका लोज म्हणून झळकणार आहेत.



दरम्यान मुलीचं यश पाहून गौरी खान देखील भावुक झाली आहे. लेकीच्या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट तर कॅप्शनमध्ये 'तू करून दाखवल सुहाना...' असं लिहिलं आहे. 


स्टारकिड्सच्या पहिल्या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, दिग्दर्शिका झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज’सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. पण सिनेमा नक्की कधी प्रदर्शित होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.