मुंबई : अभिनेता शाहरूख खान हा बॉलिवूडचा किंग खान आहे. अभिनय क्षेत्रात टॉपमध्ये असलेला शाहरूख फॅमिली मॅन आहे. शाहरूखचं आपल्या मुलांवर भरपूर प्रेम आहे. कामात किती ही व्यस्त असला तरीही शाहरूख आपल्या मुलांसोबत वेळ घालवतो. सुहाना शाहरूखची मुलगी देखील बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा होती. सुहाना आता बॉलिवूडच्या अनेक कार्यक्रमात, पार्टीत देखील दिसते. सोशल मीडियावर खास करून इंस्टाग्रामवर सुहाना खूप अॅक्टिव्ह आहे. 


याला करतेय डेट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुहानाने इंस्टाग्रामवर शेअर केलेला फोटो सध्या जास्त चर्चेत आहे. सुहाना 18 वर्षाची झाली असून आता तिचं मन एका मुलावर आलं आहे. हा मुलगा कुणी तिच्या कॉलेजचा मित्र नाही तर हा मुलगा आहे पापा शाहरूख खानच्या आयपीएल टीमचा खेळाडू. सुहाना सध्या कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूला डेट करत आहे. शाहरूखची मुलगी सुहाना यंदा देखील आयपीएलमध्ये आपल्या संघाला चीअर अप करण्यासाठी मैदानावर पोहोचली. मात्र आता अशी माहिती मिळतेय की त्याचं कारण काही वेगळंच होतं. सुहाना सध्या केकेआरचा खेळाडू शुभमन गिल याला डेट करत आहे. 



 


मैदानावर बोलताना दिसले दोघे 


मिळालेल्या वृत्तानुसार, सामन्यांनंतर मैदानावर अनेकदा शुभमन आणि सुहाना बोलताना दिसली. त्यामुळे यावेळी पापा शाहरूख खानची रिअॅक्शन नेमकी कशी होती हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. सुहाना सध्या आपल्या पुढील शिक्षणासाठी विदेशात शिक्षण घेत आहे. 22 मे रोजी सुहानाचा वाढदिवस झाले. सुहानाला बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचं पण शाहरूखने आपल्या मुलांना अगोदर शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिली आहे. 


आयपीएलमध्ये शुभमनचा करिअर उत्तम 


शुभमनने या आयपीएलमध्ये शानदार खेळ दाखवत सगळ्यांना आकर्षित केलं. अंडर 19 विश्वकपमध्ये या 18 वर्षीय युवा खेळाडूने 5 मॅचमध्ये बॅटिंग केली असून 372 धावा केल्या आहेत. पंजाबचा राहणारा शुभमन या आयपीएल सिझन 13 मध्ये फलंदाजी करताना 203 धावा केल्या.