Suhana Khan Breakup : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानची लाडकी लेक सुहाना खान ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अशी माहिती समोर आली होती की सुहाना ही लवकरच शाहरुखसोबत 'किंग' या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, सुहानानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सुहानानं खुलासा केला की तिनं ब्रेकअप केला आहे. त्यावर श्वेता बच्चननं देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुहानानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुहानानं एक जाहिरात शेअर केली आहे. ही जाहिरात शेअर करत सुहानानं कॅप्शन दिलं आहे की माझ्याकडे तुमच्यासाठी एक बातमी आहे. मी ब्रेकअप केलं. तर खाली कोणाशी केला हे सांगत सुहानानं माझ्या साबनाशी असं म्हटलं आहे. त्याचं कारण म्हणजे ही शॉवर जेलची जाहिरात होती. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. श्वेता बच्चननं एक गुलाबी रंगाचा बो आणि एक छोटा काळ्या रंगाचा हार्ट कमेंटमध्ये दिला आहे. तर सुहानानं त्या कमेंटला लाईक करत कमेंट करत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : छोटा शकीलनं दिली होती प्रसाद खांडेकरच्या वडिलांना मारण्याची सुपारी!


सुहानानं शेअर केलेल्या या पोस्टनं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण सगळ्यांना आधी वाटलं की तिचा खरंच ब्रेकअप झाला आहे. पण तिचं साबनासोबत नातं तुटल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, सुहानाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती जोया अख्तरच्या 'द आर्चीज' मध्ये काम केलं आहे. तेव्हापासून सुहाना आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, आता सुहाना ही सुजॉय घोष यांच्या अॅक्शन-थ्रिलर किंगमध्ये दिसणार आहे. त्या चित्रपटाची शूटिंग करण्यासाठी ती लंडनला जाणार आहे. तर या चित्रपटात सुहानासोबत शाहरुख खान देखील दिसणार आहे. शाहरुख हा या चित्रपटात एका डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहे. सिद्धार्थ आनंदनंच पठाण या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यामुळे आता या चित्रपटातून आपल्याला बाप-लेकीला एकत्र स्क्रिनवर पाहता येणार आहे. त्यासाठी सगळेच चाहते उत्सुक आहेत.