मुंबई : सुहाना खान अनेकदा सोशल मीडियावर स्वतःचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. बॉलिवूडमध्ये पाऊल टाकण्यापूर्वीच तिचा मोठा चाहता वर्ग आहे निर्माण झाला आहे.  अलीकडेच, स्टार किडने न्यूयॉर्कमध्ये तिच्या फ्रेण्डससोबत पार्टी केली आणि इन्स्टाग्रामवर या नाईट पार्टीचे काही फोटो समोर आले आहेत. लाल लेदरच्या ड्रेसमध्ये सुहाना जबरदस्त दिसत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पार्टीत सुहाना खानचा ग्लॅमरस लूक  

सुहाना खान अनेकदा चाहत्यांना न्यूयॉर्क लाईफमधील काही झलक दाखवण्यासाठी फोटो आणि व्हिडीओज शेअर करताना दिसते. शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहानाने इन्स्टाग्रामवर बॉडीकॉनच्या पोशाखात स्वतःचा एक फोटो शेअर केला, तिच्या मित्र मंडळींसोबत नाईट पार्टीत पोझ दिली. स्ट्रॅपलेस, शॉर्ट रेड लेदर ड्रेस आणि हाय हिल्स असा लूक तिने केला होता.



ड्रग्स प्रकरणात आर्यन खानचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळला आहे. आर्यनच्या कुटुंबाला आशा होती की त्याला बेल बॉन्डच्या आधारावर जामीन मिळेल. पण आर्यनच्या कोठडीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता आर्यन खान ड्रग्स प्रकरणी पुढे काय होईल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.