मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचा बोलबाला आहे. श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूरचा धडक सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्यानंतर सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे बॉलिवूडमध्ये पर्दापणासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांचे सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. तर एकीकडे किंग खानची मुलगी सुहाना खान आपल्या बोल्ड अंदाजाने सर्वांना टक्कर देत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीर्घ काळापासून चर्चेत असलेली शाहरुखची लाडली सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची दाट शक्यता आहे. करण जोहरच्या बॅनर अंतर्गत सुहानाला लॉन्च करण्यात येईल, अशा चर्चा रंगल्या होत्या. पण त्यापूर्वी सुहानाने VOGUE कव्हर पेजवर स्थान पटकावले आहे आणि खुद्द शाहरुखने हे लॉन्च केले आहे.


शाहरुख खानने ट्विटरवर मुलगी सुहानाचा मॅगझिन कव्हर फोटो शेअर केला. त्यात त्याने लिहिले की, तिला पुन्हा एकदा माझ्या हाताने उचलत आहे. वोग तुमचे आभार. जेव्हा आपल्या मुलांची गोष्ट येते तेव्हा त्यांना प्रेम देण्याची इच्छा असते. त्यामुळे खूप सारे प्रेम आणि हग(hug)पाठवत आहे. 



तर गौरी खानने देखील सुहानाचा फोटो शेअर करत वोग इंडियाचे आभार मानले.



सुहाना खानने वोगसाठी फोटोशूट केले. त्याचे फोटोज VOGUE मॅगझिनने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सुहानाचा फोटो शेअर करत लिहिले की, ही एका नव्या युगाची सुरुवात आहे, भेटा सुहाना खानला.
या फोटोजमध्ये सुहाना अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.