मुंबई : बॉलिवूड किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. जान्हवी कपूर, सारा अली खान या अभिनेत्रींनंतर आता अभिनेता शाहरूख खानची मुलगी लवकरच अभिनय क्षेत्रात पाउल ठेवण्याची शक्यता आहे. सुहाना खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. सुहानाचा हा व्हायरल व्हिडीओ तिच्या अभिनय विद्यालयातील आहे. या व्हिडीओ मध्ये 'फुटलूज' गाण्यवर थिरकता सुहाना दिसत आहे. सुहानाने हा व्हिडीओ स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



सुहाना तिच्या भावी आयुष्यसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. सुहानाने तिच्या वडीलांसोबत पडद्याआड काम केले आहे. त्याचप्रमाणे ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या पूर्ण तयारीत आहे. 


सुहाना सध्या लंडनमध्ये तिचे पदवीचे शिक्षण घेत आहे. गतवर्षी सुहाना तिच्या वडीलांच्या 'झीरो' सिनेमात असिस्टंट म्हणून काम पाहिले होते. त्याचप्रमाणे तिने रंगमंचावरही तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकला आहेत. शाहरूखच्या मुलीला अभिनयात आपली छाप पाडायची असून मुलाला दिग्दर्शक आणि प्रोटक्शन क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे.