मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख खान याची मुलगी सुहाना खान नेहमीच चर्चेत असते. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरदेखील ती कायम सक्रीय असते. आई गौरी खान आणि सुहाना यांच्यात मैत्रीचं नाते आहे. गौरी खान नेहमीच मुलीसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती बॉलिवूडमध्ये येण्याच्या पूर्ण तयारीत आहे. महत्वाचे म्हणजे सुहाना आता 'बेली' नृत्य कलेचे प्रशिक्षण घेत आहे. त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुहानाने यंदाच्या वर्षी पदवी संपादन केली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे ती आता कधी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार? याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सुहानाने लंडनच्या 'Ardingly College'मधून आपले पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचप्रमाणे सुहानाला सांस्कृतिक कार्यक्रमातील योगदान दिल्याबद्दल पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.


गतवर्षी सुहानाने तिच्या वडिलांच्या 'झिरो' या चित्रपटासाठी असिस्टंट म्हणून काम पाहिले होते. त्याचप्रमाणे रंगमंचावरील तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. शाहरूखच्या मुलीला अभिनयात आपली छाप पाडायची असून मुलाला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे.