Suhmita Sen On Talk With Daughters On Physical Relationship: अभिनेत्री सुष्मिता सेन ही वेगवेगळ्या विषयांवर तिच्या बोल्ड आणि बिनधास्त भूमिकांमुळे कायमच चर्चेत असते. सिंगल पॅरेंट असलेल्या सुष्मिताला दोन मुली आहेत. सध्या सुष्मिता 'आर्या' या वेब सिरीजच्या तिसऱ्या पर्वामुळे चर्चेत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सुष्मिताने तिच्या मुलींसंदर्भात बोलताना मला त्यांना सेक्स एज्युकेशन म्हणजेच लैंगिक शिक्षणाच्या दुष्टीकोनातून सेक्ससंदर्भात काही ज्ञान द्यावं लागलं नाही, असं म्हटलं आहे.


आईबरोबर मी या विषयावर केलेली चर्चा वेगळी होती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुष्मिता रेहा चक्रबर्तीच्या 'चॅप्टर-2' या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. यावेळेस तिने खासगी आयुष्यासंदर्भातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं. यावेळेस बोलताना मुली आणि आईच्या नात्यावर भाष्य करताना मी आणि माझ्या मुलींनी ज्या पद्धतीने सेक्स या विषयावर चर्चा केली ती मी आणि माझ्या आईने केलेल्या चर्चेपेक्षा फारच वेगळी होती असं सुष्मिताने सांगितलं. माझ्या आईबरोबर मी या विषयावर बोलले ते फार सविस्तर नव्हतं. मात्र माझ्या मुलींबरोबर मी आई म्हणून अगदी मोकळेपणे यावर बोलले, असंही सुष्मिताने सांगितलं.


मला मुलींबरोबर त्या विषयावर बोलावं लागलं नाही


"मला माझ्या मुलींना शरीरसंबंध (सेक्स) म्हणजे काय हे समजावून सांगावं लागलं नाही. त्यांच्याकडे आधीच याची पीएचडी आहे. खरं तर त्या वयातील सर्वांकडेच आहे. माझी धाकटी मुलगी बायोलॉजीचा अभ्यास करते. त्यामुळे तिला यासंदर्भातील संज्ञा, व्याख्या ठाऊक आहेत हे समजल्यानंतर मी तिला आपण हे फार सामान्य असल्याप्रमाणे चर्चा करुयात का? आपल्याला यामधील तांत्रिक गोष्टींमध्ये जाण्याची गरज नाही, असं मी मुलींना सांगितलेलं," असं सुष्मिता म्हणाली. 


कोणी तुम्हाला सेक्ससंदर्भात ही योग्य वेळ आहे सांगत असेल तर...


पुढे बोलताना सेक्स या विषयासंदर्भात आपण एकच गोष्ट आपल्या मुलींना वारंवार सांगितल्याचं सुष्मिताने आवर्जून नमूद केलं. "कोणी तुम्हाला सांगत असेल की ही योग्य वेळ आहे किंवा ही योग्य गोष्ट आहे" तर त्यावर चर्चा करण्याची माझी इच्छा नाही. कारण या गोष्टी तुमच्यात आणि तुमच्या फ्रेण्ड सर्कलमध्ये असल्या पाहिजेत," असं सुष्मिता म्हणाली. तसेच पुढे बोलताना, "तुम्ही यासंदर्भात काय ते ठरवा आणि स्वत:च्या आयुष्यात शरीरसंबंधांना योग्य तो सन्मान द्या," असंही सुष्मिताने मुलींना सांगितल्याचं नमूद केलं. 


तुमची इच्छा आहे म्हणून सेक्स करा पण...


"तुम्ही (सेक्ससंदर्भात विचार करताना) स्वतःला आणि स्वत:च्या इच्छेचा शोध घेऊ शकता, त्यात (मला) कोणतीही अडचण नाही. पण शेवटी, यामुळे तुम्हाला वाईट वाटणार नाही याची काळजी घ्या कारण ते सर्वात महत्त्वाचे आहे. समवयस्करांच्या दबावात येऊन सेक्स करु नका. तुमची इच्छा आहे म्हणून तुम्ही सेक्स करा पण समवयस्करांच्या दबावात येऊन असं काही करु नका, असा विचार हवा,” असं सुष्मिता मुलींबरोबरच्या संवादासंदर्भात सांगताना म्हणाली.