धक्कादायक... पुनीत यांच्या निधनानंतर एका चाहत्याची आत्महत्या, दोघांचा मृत्यू
पुनीत यांच्या जाण्याचा धसका....
नवी दिल्ली : पुनीत राजकुमार यांनी वयाच्या 46 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. साऊथचा सुपरस्टार पुनीत यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना शुक्रवारी सकाळी बेंगळुरूच्या विक्रम हॉस्पिटलच्या आयसीयूत दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या निधनामुळे त्यांच्या एका चाहत्याने आत्महत्या केली तर अन्य दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील हनूर तालुक्यातील मारो गावातील 30 वर्षीय व्यक्तीला ही बातमी समजताचं त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर चाहत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण चाहत्याचा जागीच मृत्यू झाला. मुनियप्पा असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो शेतकरी आहे. त्याच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत.
बेळगावच्या शिंदोली गावात आणखी एका चाहत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. परशुराम देमण्णावर असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो पुनीत राजकुमारचा कट्टर चाहता होता. अभिनेत्याच्या निधनाची माहिती मिळताचं चाहत्याचं रात्री 11 वाजता हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झाले.
एवढंच नाही तर एका चाहत्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या पुनीतच्या चाहत्याचं नाव राहुल गादिवादारा असल्याचं समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याने प्रथम पुनीतचा फोटो फुलांनी सजवला आणि नंतर राहत्या घरी गळफास घेवून आपलं जीवन संपवलं.