सलमान खानच्या `सुल्तान`ला आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन पुरस्कार
अभिनेता सलमान खानचा `सुल्तान` चित्रपट 2016 साली सुपरहीट ठरला होता.
मुंबई : अभिनेता सलमान खानचा 'सुल्तान' चित्रपट 2016 साली सुपरहीट ठरला होता.
आता हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहचला आहे. नुकताच या चित्रपटाने 'तेहरान स्पोर्ट्स फिल्म फेस्टिवल'मध्ये अवॉर्ड मिळवला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती
आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाने 'फेव्हरेट फिल्म' सोबतच सलमान खानला 'बेस्ट अॅक्टर' आणि अनुष्का शर्माला 'बेस्ट अॅक्ट्रेस' चा पुरस्कार मिळाला आहे.
अली अब्बास जफरने 'सुल्तान' या चित्रपटाच्या पटकथेचे कौतुक केले आहे. उत्तम कहाणीमुळे हा चित्रपट सातासमुद्रापारही पोहचला आहे. तेहरान इंटरनॅशनल स्पोर्ट्स फिल्म फेस्टिवलमध्ये 'सुल्तान' चित्रपटाला मिळालेल्या कौतुकाचे त्याने आभार मानले आहेत. अली अब्बास जफरलाही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आणि डिप्लोमा दिला आहे. सलमान आणि अनुष्कालाही डिप्लोमा देण्यात आला आहे.
कशावर आधारित आहे चित्रपट ?
'सुल्तान' चित्रपटाची कहाणी एका पेहलवानाच्या जीवनावर आधारित आहे. एका मुलीच्या प्रेमात पडल्यानंतर तो पेहलवान होतो. हळूहळू तो उत्तम पहलवान होतो. पहेलवानीवरून त्याचं लक्ष प्रेमाकडे अधिक झुकतं. परिणामी त्याच्या कुटुंबावर त्याचा परिणाम दिसून येतो.