सुमोना चक्रवर्ती करणार काजोलच्या भावाशी लग्न?
सुमोना चक्रवर्ती ही काजोलच्या कुटुंबाची सून होणार आहे....
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, 'द कपिल शर्मा शो'ची सुमोना चक्रवर्ती ही काजोलच्या कुटुंबाची सून होणार आहे. हे वृत्त हाती येताच सुमोनाने आता या बातमीमागील सत्य सांगितलं आहे. हे सत्य जाणून चाहत्यांना आश्चर्य वाटेल.
सुमोना चक्रवर्तीचं नाव सम्राट मुखर्जीसोबत जोडलं गेलं
सुमोना चक्रवर्तीचं नाव बंगाली अभिनेता सम्राट मुखर्जीसोबत जोडलं जात आहे. दरम्यान, सुमोना लवकरच सम्राटसोबत लग्न करणार असल्याच्या बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. खरंतर, सम्राट दुसरा कोणी नसून काजोल, तनिषा, राणी मुखर्जी आणि अयान मुखर्जी यांचा चुलत भाऊ आहे.
सुमोनाने मौन तोडलं
या बातम्या व्हायरल होताच सुमोना चक्रवर्ती यांनी मौन तोडले. एका मुलाखतीमध्ये बोलताना सुमोना म्हणाली, 'या सगळ्या बातम्या 10 वर्षे जुन्या आहेत ज्या सोशल मीडियावर फिरल्या होत्या. हे सर्व बकवास आहे. सध्या तरी मला याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. तसंच मला काही कमेंट करायची नाही. मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला आवडत नाही. अजून काही बोलणं झालं तर कळेल. मी स्वतः याबद्दल सांगेन.
यानंतर सुमोनाला जेव्हा मुलखतीत विचारण्यात आलं की, सम्राट मुखर्जी तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे का? यावंर उत्तरात सुमोना म्हणाली की, 'तो माझा फक्त मित्र आहे'. यापेक्षा अधिक काहीच नाही. मला माझ्या मित्र-परिवाराबद्दल मीडियाशी बोलणं आवडत नाही. मी तुम्हाला माझ्या लग्नाबद्दल आधीच सांगितलं आहे.