मुंबई : प्रसिद्ध रॅपर बादशाह (Rapper Badshah) सध्या सुट्यांचा आनंद लूटण्यासाठी मालदीवमध्ये आहे. पण या दरम्यान त्याला 'सनबर्न'चा फटका बसला. त्याच्या चेहऱ्यावर याचा परिणाम झाला आहे. बादशाहने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचा चेहरा हा उन्हामुळे जळाल्याचं दिसतं आहे. त्याने फोटोला सनबन्ट्र असं कॅप्शन दिलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोस्टवर गायक अरमान मलिकने प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'बॅड बर्न.' तर मनीष पॉलने म्हटलं की, 'भाई टोस्टरमध्ये ब्रेडच्या जागी तुच गेलास का? अभिनेत्री मृणाल ठाकुरने म्हटलं की, 'ओह नो.'


बादशाहने काही दिवसांपूर्वीच शाहरुख खानची आयपीएल टीम, कोलकाता नाईट रायडर्ससाठी एक नवं गाणं गायलं होतं. या व्हिडिओमध्ये रॅपर सोबत शाहरुख खान देखील दिसत आहे.