`सुंदरा` फेम अक्षया नाईकचं ट्रोलर्सला खणखणीत उत्तर, तुम्ही ही कराल कौतुक, बॉडी शेमिंगवर म्हणाली...
akshaya naik on body shaming: सध्या चर्चा आहे की म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक हिची. सध्या तिनं एका मुलाखतीतून बॉडी शेमिंग यावर भाष्य केले आहे. तिच्या अभिनयाचे सर्वच चाहते आहे परंतु यावेळी ती नक्की काय म्हणाली आहे यावर चर्चा रंगली आहे.
akshaya naik on body shaming: मनोरंजन क्षेत्रात आलं म्हणजे सडपातळ शरीर आणि फीटनेस म्हत्त्वाचा असा समज असताना अशा रूढ गोष्टींना जुगारून आपण जसे आहोत तसे स्वत:ला स्विकारणं किती म्हत्त्वाचे आहे याचे महत्त्व अनेकदा अभिनेत्रींनी आपल्यासमोर व्यक्त केले आहेत त्यामुळे अशा अभिनेत्रींची अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. त्यातून मराठी चित्रपटसृष्टीतही आता हा बदल स्विकारला जाऊ लागला आहे. अशाच आता चर्चा आहे ती म्हणजे अक्षया नाईक या अभिनेत्रीची. आपल्या अभिनयाच्या आणि आपल्या कामाच्या जोरावर आपण जग जिंकून शकतो याचे दर्शन या अभिनेत्रींकडे पाहू कळते. त्यातील एक म्हणजे अक्षया नाईक. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेनंतर तिच्या लोकप्रियतेत तूफान वाढ झाली होती. तिच्या अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.
आपल्या वजनामुळे आजही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना ट्रोल व्हावे लागते त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. अनेकदा अक्षयालाही अशा प्रसंगांना समोरे जावे लागले आहे. त्यातून अनेकादा तिनं याविषयी अगदी मोकळेपणानंही सांगितले आहे. सध्या एका मुलाखतीतही तिनं याचं प्रश्नावर उत्तरं दिले आहे. अक्षयाने युट्यूबर श्रेयस देसाईच्या युट्युब चॅनलला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिनं बॉडी शेमिंगविषयी स्वत:च अनुभव सांगितला आहे. यावेळी तिनं आपलं याविषयी परखडं मत व्यक्त केलं असून आपल्याला आलेल्या अनुभवावरही तिनं भाष्य केले आहे. त्यावेळी या लेखातून जाणून घेऊया की ती नक्की काय म्हणाली आहे?
हेही वाचा - शाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या ट्रेलरवर सलमान खान म्हणतो, 'मी थिएटरमध्ये...'
तिला ''तुझ्यासारख्या हेल्दी मुलीला, मी जाडं नाही म्हणणार पण हेल्दी मुलीला वजनामुळे काही नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो का?'' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर अक्षयाने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. हे ऐकून तुम्ही तिचं नक्कीच कौतुक कराल हे नक्की.
ती यावर म्हणाली की, ''जाड का म्हणायचं नाही. हा एक सोपा एखाद्याचं वर्णन करणारा शब्द आहे. तुम्ही तसं म्हणता कारण मी आहे जाडी'', त्यापुढे ती म्हणाली की, ''आपल्या मनात जाड म्हटलं की एक नकारात्मक भावनाच येते. असं का? कारण सुरूवातीपासून आपल्या मनावर तसंच बिंबवण्यात आलं आहे. पण कोणी जाड म्हटलं तरी दुखावलं जाण्यासारखं काहीच नाही आहे. ही गोष्ट मी स्वतः खूप वर्षांनी एक्सेप्ट केलीये.'' असं सरळ मत तिनं व्यक्त केलं आहे.