Sunidhi Chauhan Concert Video : भारतातील लोकप्रिय गायिकांमध्ये सुनिधी चौहानचं नाव घेतलं जातं. सुनिधीचा आवाज हा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. सुनिधी हाय-ऑक्टेन जेव्हा गाते तेव्हा जणू तिथे उपस्थित असलेले लोक हे मंत्रमुग्ध होतात. वयाच्या 13 व्या वर्षी चित्रपटात गाणं गात कलाक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सुनिधीचे लाखो चाहते आहेत. तिचे अनेक कॉन्सर्ट देखील होत असतात. 30 वर्षां पेक्षा जास्त मोठ्या असलेल्या या करिअरच्या काळात सुनिधीनं स्वत: चं नाव लोकप्रिय गायकांमध्ये शामिल करुन घेतलं आहे. दरम्यान, सुनिधीचा नुकताच एक कॉन्सर्ट झाला त्या कॉन्सर्टमध्ये तिच्यावर पाण्याची बॉटल फेकण्यात आली. तर या सगळ्यावर सुनिधीनं ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच सुनिधीचा देहरादूनमध्ये असलेल्या एका कॉलेजमध्ये एक खूप चांगला परफॉर्मेंस दिला. यावेळी सुनिधीनं स्पोर्ट्स जर्सी स्टाईलमध्ये असलेला मिडी ड्रेस परिधान केला होता. यात सुनिधी खूप सुंदर दिसत होती. तिनं तिची गाणी गायली आणि तिथे आलेल्या प्रेक्षकांची मने जिंकली. सुनिधीनं यावेळी तिच्या गाण्यांमध्ये अनेक क्रॉसओव्हर देखील आणले. सध्या तिच्या परफॉर्मेन्समधील एक क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात सुनिधी गात असतानामध्येच प्रेक्षकांमधून कोणी तिच्यावर बॉटल फेकून मारतं. ते पाहून सुनिधीला आश्चर्य होतं त्यानंतर ती पुढे न थांबता गाताना दिसते. त्यानंतर पुन्हा एकदा एक बॉटल सुनिधीच्या चेहऱ्याच्या जवळ येऊन खाली पडता दिसते. हे पाहता सुनिधी वॉकआऊट न करता शोला न थांबवता, तिच्या चाहत्यांशी तिनं इन्टरॅक्ट केलं. त्यावेळी तिनं त्यांच्याकडे गाण्याचे लिरिक्स अर्थात संपूर्ण गाणं गाण्यासाठी परवानगी मागितली. त्यावेळी ती शांतपणे म्हणाली की हे काय होतंय? बॉटेल फेकल्यानं काय होणार आहे? शो थांबेल, तुम्हाला ते हवंय का?


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : 'Heeramandi मध्ये आम्ही कोट्यावधींचे खरे दागिने वापरले', रिचाचा खुलासा; म्हणाली, 'मी ते परिधान करून पळाली असती तर..'


सुनिधीचा हा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल झाला आणि त्यानंतर सुनिधीला पाठिंबा देत तिचे चाहते आणि नेटकरी पुढे आले. नेटकरी म्हणाले की तिनं ऑडियन्समधून कोणी पाण्याची बॉटल फेकून मारतंय या गोष्टीला खूप शांतपणे घेतलं. असं कोणी करत नाही. दुसरा नेटकरी म्हणाला, तिच्या कामाची स्तुती करायला हवी आणि तिचा तिथे असलेल्या सगळ्यांनी आदर करायला हवा. दुसरा नेटकरी म्हणाला, ती इतकी पावरफूल आहे की ती अशा गोष्टींना घाबरत नाही.