...लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच एकाएकी सुनील शेट्टीच्या लेकिनं सोडलं घर
सर्वकाही ठिकंय ना?
मुंबई : अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी, अथिया शेट्टी (Athiya Shetty) तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त आणखी एका गोष्टीमुळं चर्चेत आली. ती चर्चा होती, क्रिकेटपटू के.एल. राहुल (KL Rahul) याच्याशी असणारं तिचं नातं. अथिया आणि केएलनं त्यांचं प्रेमाचं नातं कधीच कोणापासून लपवलं नाही. कौटुंबीक समारंभांपासून एकमेकांसोबत परदेश दौऱ्यांवर जाण्यापर्यंत ही जोडी सातत्यानं एकमेकांसोबतच दिसत होती. किंबहुना आताही दिसते.
अथिया आणि तिच्या प्रियकरामध्ये वाढती जवळीक पाहता काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांनीही जोर धरला होता. पण, आता म्हणे या लग्नाच्या चर्चाही मागे पडल्या आहेत. कारण, अथियानं तिच्या वडिलांचं राहतं घर सोडण्याचा निर्णय घेत त्या अनुशंगाने पावलंही उचलली आहेत. (Athiya KL Rahul Live In Relationship)
अथियानं एकाएकी वडिलांचं घर का सोडलं? हाच प्रश्न अनेकांना पडला आणि पुढच्याच क्षणी या प्रश्नाचं उत्तरही समोर आलं. सूत्रांच्या माहितीनुसार अथिया आणि तिचा प्रियकर, क्रिकेटपटू के.एल. राहुल आता लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहू लागले आहेत.
मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या कार्टर रोड परिसरात त्यांनी एक घर घेतलं आहे. अथिया जवळपास आठवड्याभरापूर्वीच केएलच्या घरी राहण्यास गेली आहे. सध्या हा क्रिकेटर झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये व्यग्र आहे. त्यातच अथिया तो येण्यापूर्वी त्याच्या घरी राहण्यास गेल्यामुळं केएलसाठी परतल्यानंतर एक मोठं SURPRISE तयार असेल, ही शक्यता नाकारता येत नाही.
खुद्द सुनील शेट्टी आणि त्याची पत्नी, माना शेट्टी यांनीच जुलै महिन्यात या घरात एक छोटेखानी पूजाही केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.