मुंबई : सेलिब्रिटी नेहमीच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपल्या लाईफमधील हॅपी मुव्हमेंट शेअर करताना दिसतात. कधी नव्या प्रोजेक्टची बातमी, तर कधी फॅमिलीसोबतचे गोड क्षण ते फॅन्ससोबत शेअर करत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेते सुनिल बर्वे यांनी एक खास पोस्ट शेअर केलीये. सुनिल बर्वे इंस्टाग्रामवर तितकेसे अॅक्टीव्ह नसतात. पण जेव्हा ते फॅमिलीसोबतचे खास क्षण शेअर करतात तेव्हा त्यांच्या पोस्टला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसते. नुकताच त्यांनी शेअर केलेली लेकीसोबतचा व्हिडिओ सगळ्यांनाच भावूक करणार आहे.



मुलीच्या लग्नात परफॉर्म करतानाचा हा व्हिडिओ आहे.ज्यात स्टार बाप-लेकीची या जोडीने आपल्या गोड अंदाजाने उपस्थितीत सगळ्यांचाच डोळ्यात पाणी आलंय.


या लग्नसोहळ्यात अनेक मराठी अभिनेते देखील हजर होते. त्यांना देखील हा परफॉर्मन्स पाहून गहिवरुन आलं. सुनिल बर्वे यांनी लेक सानिका बर्वेसोबतचा हा व्हिडिओ पोस्ट करत मुलीच्या लग्नातील आठवणी ताज्या केल्या आहेत. प्रत्येक वडिलांसाठी आपल्या मुलीला दुसऱ्या घरी देताना एक बाप म्हणून काय वाटतं, ते सुनिल वर्बे यांच्या या व्हिडिओत स्पष्ट दिसून येतं आहे.


सुनिल बर्वे सध्या स्मॉल स्क्रिनवरील 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत. त्याच्या पात्राला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळतेयं.