Nargis and Sunil Dutt: बॉलिवूडच्या सेटवर अनेक गोष्टी घडताना दिसतात. त्यातील एक गोष्ट म्हणजे कधी कोणती गोष्ट घडेल याचा काही पत्ता नाही. हो, सध्या आम्ही अशाच एका किस्स्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. हा किस्सा आहे सुनील दत्त आणि निरगस यांचा. सध्या त्यांचा एक प्रसंग हा सोशल मीडियावर चांगलाच चर्चा आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चाही रंगलेली आहे. 1950 आणि 1960 च्या काळात नर्गिस आणि सुनील दत्त हे फारसं लोकप्रिय असे कलाकार होते. त्यांची जोरात चर्चा रंगलेली असायची. राज कपूर आणि नर्गिस यांचेही अनेक चित्रपट गाजले होते. त्यामुळे त्यांचीही जोरदार चर्चा होती. आताही त्यांचे चित्रपट हे आवडीनं पाहिले जातात. चला तर मग जाणून घेऊया की नक्की हा किस्सा आहे तरी काय? हा किस्सा तसं पाहिलं तर फार जुना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा किस्सा असा आहे की एकदा अभिनेते सुनील दत्त हे एक रोमॅण्टिक सीन शुट करत होते. तेव्हा अचानक नर्गिस आल्या होत्या. तेव्हा मात्र ते फारच घाबरले होते. खरंतर जेव्हा सुनील दत्त यांनी बॉलिवूडमधून पदार्पण केले होते. त्यापुर्वी ते रेडिओ प्रेझेंटर होते. त्यानंतर त्यांना चित्रपटातून काम करण्याची संधी मिळाली होती. परंतु तेव्हा त्यांच्या आईंनी या गोष्टीला साफ नकार दिला होता. तेव्हा त्यांच्या एका वेगळ्या करिअरला सुरूवात झाली होती. कारण त्यांच्या आईची अशी इच्छा होती की त्यांनी आधी आपलं शिक्षण पुर्ण करावे. परंतु नंतर ते चित्रपटसृष्टीत आले आणि ते फार मोठे सुपरस्टार झाले होते. 


1969 साली आलेला चित्रपट चिराग मधून आशा पारेख आणि सुनील दत्त हे मुख्य भुमिकेत होते. या चित्रपटाचे शुटिंग हे काश्मिरमध्ये झाले होते. आशा पारेख यांनी 'बातों बातों में' या शोमधून सुनील दत्त यांच्याबद्दल खुलासा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, चिराग या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान अचानक सेटवर नर्गिस दत्त आल्या होत्या. तेव्हा सुनील दत्त त्यांना पाहून म्हणाले की ही इकडे कशी काय आली? तेव्हा सुनील दत्त यांनी त्यांनी सेटवरून फार दूरवर बसायला सांगितले. याचे कारण असे होते की ते सेटवर कधीही कोणाला बसू दते नसतं. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. 


यावेळी आशा पारेख असं म्हणाल्या होत्या की, सुनील दत्त यांचा काम करण्याचा अंदाज हा फारच वेगळा होता. त्यातून ते कायमच वेगळ्या प्रकारे काम करायचे. जेव्हा ते रोमॅण्टिक सीन शूट करायचे तेव्हा ते कोणालाही सेटवर बसू द्यायचे नाहीत. एकदा तर त्यांनी आपल्या आईंनाही सेटच्या बाहेर बसायला सांगितले होते.