`घरात राहिलात तर दारूची दुकानं लवकर उघडतील`
लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहे.
मुंबई : फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. या युद्धाच्या काळात राज्य सरकार आणि केंद्र सरकार मोठ्या संयमाने आणि विचाराणे हे युद्ध लढताना दिसत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सरकारकडून लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. २५ मार्च पासून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. आज लॉकडाऊनचा आकरावा दिवस आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण महत्त्वाच्या सेवा देखील बंद आहेत. त्यामुळे जनतेने घरा बाहेर न निघण्याचे आवाहन अनेक कलाकार देखील त्यांच्या अनोख्या अंदाजात करत आहेत.
त्यात विनोदवीर अभिनेता सुनील ग्रोवरनेदेखील एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. घरात रहाल तर दारूची दुकानं लवकर उघडतील असं त्याने म्हटलं आहे. नागरिकांनी घरात राहवं म्हणून सुनिलने अनोखी शक्कल लढवली आहे. त्याचा हा मजेशिर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रामाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये शेवटी निवड तुमची आहे, असं लिहिलं आहे.सध्या देशात अत्यंत भयानक स्थिती आहे. कोरोना व्हायरस या धोकोदायक विषाणूची लागण लाखो जणांना आहे. चीनच्या वुहानमध्ये उदयास आलेलं हे वादळ अद्यापही शमलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाउन केल्यापासून दारुची दुकाने व बार बंद झाले. त्यामुळे अनेक तळीराम दारुच्या शोधात सतत घराबाहेर पडताना दिसतात.