कपिलच्या नव्या शोमध्ये नाही गुत्थी, सुनील ग्रोवरचा नवा शो येतोय
कॉमेडी किंग कपिल शर्माचा `फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा` लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नव्या ढंगात, नव्या रुपात हा शो पाहायला मिळणार आहे.
मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माचा 'फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नव्या ढंगात, नव्या रुपात हा शो पाहायला मिळणार आहे.
कपिल आणि सुनिल ग्रोवरचा वाद वर्षभर सुरू आहे.पण आपआपसातील भांडण विसरून हे दोघं एकत्र दिसतील अशी आशा त्यांच्या फॅन्सना होती. पण सुनीलच्या ट्विटमुळे या आशेवरही पाणी फेरलं गेलयं.
तु कपिलच्या शोमध्ये का नाही ?
तु कपिल शर्मा शोमध्ये का नाही येत ? असे सुनीलच्या एका फॅन्सने त्याला विचारल.
यावर उत्तर देताना सुनील म्हणाला, तुमच्यासारखे असे खूपजण मला विचारत असतात. पण मला शोमधून कोणताच फोन आला नाही. माझा फोन नंबर पण तोच आहे.
नवा शो घेऊन येणार
वाट पाहून मी नवा शो साइन केलाय. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे लवकरच तुमच्या समोर येणार असल्याचेही सुनीलने म्हटले.