मुंबई :  सुनील ग्रोवर सध्या कपिल शर्मासोबत सुरू असलेल्या ट्विटर वॉरमुळे चर्चेत आहे. नुकतेचा त्याने एका भाजी मंडईत बसून भाजी विकतानाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर फॅन्सने त्याला कपिल शर्मा सोबत काम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच फॅन्स म्हणाले की, भाई जल्द नया काम सर्च कर लो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोमध्ये सुनीलने Entrepreneurial कॅप्शन देत आपला फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून फॅन्सने अंदाज लावला की हा फोटो कपीलवर कमेंट करण्यासाठी पोस्ट करण्यात आला आहे. 



गेल्या काही दिवसांपासून आपल्या अंदाजात सुनील ग्रोवर टॉन्ट मारत आहे. सोशल मीडियावर या फोटोवर वेगवेगळे कमेंट येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही कलाकारांमध्ये होणारी लढाई जगजाहीर आहे. त्यात सुनील आपला नवीन शो घेऊन येत आहे. 


मीडियामध्ये आलेल्या बातम्यानुसार सुनीलचा नवा शो बिग बॉसची विनर शिल्पा शिंदे सोबत असणार आहे. या शोचा कॉन्सेप्ट काय असणार याचा खुलासा अजून झालेला नाही. पण सुनीलने शिल्पा शिंदेसोबत एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओ शिल्पाही  सुनील ग्रोवरचे फेमस गाणे मेरे पति मुझे प्यार नहीं करते की कॉपी करताना दिसत आहे.