VIDEO : सुनील ग्रोव्हरच्या घरी चोरी
सुनिलने व्हिडिओ शेअर करत काय चोरीला गेलं याची माहिती दिली आहे.
मंबई : अभिनेता व कॉमेडियन सुनील ग्रोव्हरने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या कॉमिक टायमिंगने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता व कॉमेडियन सुनील ग्रोव्हर याने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. होय, या व्हिडीओवर सध्या कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडत आहे. व्हिडीओ कसला तर एका माकडाचा.
एक माकड किचनमध्ये शिरतो आणि सगळ्यांचा डोळा चुकवत दही घेऊन पळून जातो, असे या व्हिडीओत दिसतेय. सुनील या व्हिडीओत दिसत नाही. कारण काय तर हा व्हिडीओ त्याने स्वत:च शूट केला आहे. ‘दही ले गया,’ या कॅप्शनसह सुनीलने हा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ आत्तापर्यंत 4 लाखांवर लोकांनी पाहिला.