कपिल शर्मा शो सोडल्यानंतर सुनील ग्रोव्हरवर आली अशी वेळ, आता करतोय हे काम..
चाहते त्याच्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत आणि विविध प्रश्न त्याला विचारत आहेत.
मुंबई : कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो अनेकदा मजेदार पोस्ट करतो ज्यामुळे चाहत्यांचं खूप मनोरंजनही होतं. आता त्याने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुनील एका शेंगदाण्याच्या दुकानात जातो. पण नंतर तो स्वतः वाळूत शेंगदाणे भाजू लागतो.
यादरम्यान तो काहीतरी बोलत असल्याचंही दिसत आहे व्हिडिओमागे बेला चाव हे गाणं वाजताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिलं आहे की, खा, खा, खा. सुनीलच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत
कॉमेडियन सुनील सिंग ग्रोव्हरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुनील ग्रोव्हर रस्त्याच्या कडेला शेंगदाणे भाजताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुनील ग्रोव्हरने स्वतः हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. कॉमेडियनचा हा व्हिडिओ समोर आल्यापासून त्याचे चाहते नाराज झाले आहेत. एवढ्या मोठ्या विनोदवीराला शेंगदाणे विकावे लागले असं काय झालं, असा एकच प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत आहे.
चाहत्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले
चाहते त्याच्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत आणि विविध प्रश्न त्याला विचारत आहेत. एका चाहत्याने लिहिलं की, 'भाऊ, पत्ता द्या, आम्हीही येतो.' दुसर्या युजरने कमेंट करत लिहिलं, 'कसे आले दिवस'. एका युजरने कॉमेडीयनची खिल्ली उडवत 'द कपिल शर्मा शो सोडल्यानंतर तुझ्यावर ही वेळ आली आहे' अशी कमेंट केली. तर काहीजणांना अभिनेत्याचा हा व्हिडीओ पाहून धक्काच बसतोय.
काय आहे या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य?
कॉमेडियन सुनील ग्रोव्हर अनेकदा व्हिडिओ शेअर करून आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करतो. त्याने त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी हा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये विनोदी कलाकार शेंगदाणे विक्रेत्याच्या दुकानात बसून शेंगदाणे भाजताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करत सुनीलने 'खाओ खाओ खाओ' असं कॅप्शन दिलं आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे