मुंबई : कपिल शर्मा भले किती ही सुनील ग्रोवरच्या परत येण्याची वाट पाहत असेल. तरी त्याचा आता काहीच फायदा होणार नाही. कारण.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचं एकमेव कारण आहे अक्षय कुमार आणि त्याचा नवा शो. आपल्या साऱ्यांना माहितच आहे अक्षय कुमार लवकरच एका टिव्ही शोमध्ये कमबॅक करत आहे. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोमधून अक्षय कुमार आपल्याला छोट्या पडद्यावर दिसणार आहे. 


या शोला होस्ट करण्यासाठी अली अवरामची निवड करण्यात आली होती. मात्र अलीची स्क्रिन टेस्ट आणि रिहसल झाल्यानंतर त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता अशी माहिती मिळत आहे की, सुनील ग्रोवर आता या शोची कमतरता भरून काढणार आहे. सप्टेंबर महिन्यात हा शो ऑनएअर होणार आहे. त्यामुळे सुनील ग्रोवर या शोमध्ये येण्यासाठी पुर्णपणे तयार आहे. 


त्याचप्रमाणे असं देखील सांगण्यात येत आहे की, या शोमध्ये अक्षय कुमार जजच्या रुपात दिसणार आहे. तसेच या शोमध्ये जाखिर खान, मल्लिका दुआ आणि हुसैन दलाल देखील दिसतील.