बेपत्ता झाल्यानंतर अचानक कॉमेडियन सुनील पाल समोर आला अन् म्हणाला, `दिल्लीतून माझं अपहरण...`
Sunil Pal : कॉमेडियन सुनील पाल यांच्या बेपत्ता होण्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलंय. खुद्द सुनीलने तो कुठे होतो याबद्दल माहिती दिलीय.
Sunil Pal : कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे. सुनील बेपत्ता झाला नसून त्याचे अपहरण झाल्याची माहिती समोर आलीय. खुद्द सुनील पाल यांनी झी २४ तासला ही माहिती दिलीय. यावेळी त्याने आपले अपहरण झाल्याचे उघड केले. आपण दिल्लीहून मुंबईला जात असून उद्या मुंबईत येऊन संपूर्ण माहिती देणार असल्याचेही अभिनेत्याने सांगितलंय.
मंगळवारी (3 डिसेंबर) रात्री अचानक सुनील पाल बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. त्याची पत्नी मुंबईतील सांताक्रूझ पोलीस सुनील पाल बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. याबातमी नंतर चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती.
अभिनेत्याच्या बेपत्ता झाल्याच्या बातम्यांदरम्यान, त्याचा एक दिवस आधीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तो बोटिंग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी विविध अंदाज बांधण्यास सुरुवात केली होती.
मात्र झी २४ तासला सुनील पालने दिलेल्या माहितीनुसार सुनील पालचे 2 डिसेंबर सोमवारी अपहरण झालं होतं. आता तो सुरक्षीत यातून बाहेर आल्याची माहिती खुद्द सुनील याने दिलीय. पोलिसांना याबद्दल मी संपूर्ण माहिती दिलीय. दिल्ली मेरठ महामार्गावरुन अपहरण झाल्याचं सुनील पाल म्हणाला.
तर सुनील पालची पत्नी सरिता पाल हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना लिहिलंय की, सगळं ठीक आहे. सुनीलजी पण ठीक आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा लवकरच खुलासा करू. एकदा पोलीस तपास पूर्ण झाला आणि एफआयआरची औपचारिकता पूर्ण झाली. याबाबत बोलणार आहे. आता सरिता पाल यांच्या या पोस्टनंतर, सुनील पाल यांचे खरेच अपहरण झाले आहे की, एका विचारी योजनेचा भाग म्हणून हे केले जात आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थितीत केला जातोय.
सुनीलला 2005 मधील 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोचे विजेतेपद त्याने पटकावल्यानंतर त्याला खरं ओळख मिळाली. त्यानंतर सुनील अनेक कॉमेडी रिॲलिटी शोमध्ये दिसायला लागला. त्याने स्टँड-अप कॉमेडीही केली त्याशिवाय चित्रपटांमध्ये तो झळकलाय. त्याने 'हम तुम' (2004) आणि 'फिर हेरा फेरी' (2006) सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत.