Sunny Deol ला अचानक काय झालं?, भर कार्यक्रमात संताप अनावर, पत्रकार घाबरले!
भर पत्रकार परिषदेत सनी देओलने असं काही केलं की सगळेच घाबरले
Sunny Deol Chup Movie : असा एक काळ होता, ज्यावेळी अभिनेता सनी देओल (Bollywood actor Sunny Deol) ज्या चित्रपटात काम करत होता तो चित्रपट हीट मानला जायचा. सनी देओल म्हणजे चित्रपटाच्या यशाची गॅरेंटी असायची. मात्र, गेल्या 11 वर्षापासून सनी देओलच्या चित्रपटांना यश मिळताना दिसलं नाही. मात्र, सनी देओल बॉलिवूडमधील सुपरस्टार होता आणि पुढे देखील राहिल. आता पुन्हा सनी मोठ्या पडद्यावर धमाका करण्यासाठी तयार आहेत.
अभिनेता सनी देओल यांचा चूप (chup Movie) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दलकीर सलमान (Dalquer Salman), पुजा भट्ट (Pooja Bhatt) आणि श्रेया धनवंतरि (Shreya Dhanwanthary) हे कलाकार असतील. येत्या 23 सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता चित्रपटाचे स्टार कास्ट जीव ओतून सिनेमाच्या प्रमोशनसाठी फिरताना दिसत आहेत.
अशातच एका ठिकाणी चित्रपट प्रमोशन (chup Movie promotion) टीम गेली असताना सनी देओलने असं काही केलं की, सर्वांच्या नजरा सनीवर खिळल्या होत्या. सनीच्या कृत्यामुळे कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना काहीवेळ भीती देखील वाटली.
नेमकं काय झालं?
चूप चित्रपटाचं प्रमोशन (chup Movie)करत असताना टीमने पत्रकार परिषद घेतली. पत्रकार वेगवेगळे प्रश्न विचारत असताना अचानक सनी देओल हातात माईक घेऊन रागात ओरडला. सनीचा राग पाहता सर्वजण अचानक शांत झाले. सनीला अचानक काय झालं?, असा प्रश्न सर्वांना पडला.
पण दुसऱ्याच क्षणी सनी हसायला लागला आणि त्यामुळे सगळ्यांना समजलं की हा त्यांच्या चित्रपट प्रमोशनचा एक हिस्सा आहे. त्यानंतर सर्वजण रिलाक्स झाले आणि पुन्हा गप्पा रंगल्या.
पाहा व्हिडीओ-
सनी देओलने खूप वर्षानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. 2019 साली मोहल्ला अस्सी चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र सिनेमा जास्त चालला नाही. आता सनीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ करणार अशी चर्चा सुरू आहे.