Sunny - Bobby Deol : बॉलिवूड अभिनेता सनी देओल हा नेहमीच आपल्याला एक चांगला अभिनेता, एक चांगला मुलगा आणि एक चांगला भाऊ म्हणून पाहायला मिळाला आहे. मात्र, तुम्हाला माहित आहे का की सनी देओलनं भाऊ बॉबी देओलचा पहिला चित्रपट खास असावा यासाठी खूप प्रयत्न केले. त्यासाठी त्यानं बॉबीसोबत काही एक्सपेरिंमेंट देखील केले. असं करत असताना बॉबीला सनीचा हा एक्सपेरिंमेंट खूप महागात पडला, कारण चित्रपट यशस्वी झाला. पण बॉबीला, बेस्ट डेब्यूचा पुरस्कार हा रुग्णालयात घ्यावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉबी देओल हा त्याच्या बॉलिवूड डेब्यूची तयारी करत होता. तेव्हा सुभाष घई यांना त्यांच्या 'सौदागर' या चित्रपटात बॉबीला घ्यायचे होते. पण धर्मेंद्र यांना हे पसंत नव्हतं. बॉबी देओलच्या बॉलिवूड डेब्यूची जबाबदारी धर्मेंद्र यांनी शेखर कपूर यांना दिली. शेखर कपूर यांनी बॉबी देओल आणि ट्विंकल खन्नासोबत या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. चित्रपटाचं 27 दिवसांचं शूटिंग झाल्यानंतर शेखर कपूर यांना 'बैंडिट क्वीन' या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी बॉबीचा चित्रपट सोडत या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यास पसंती दिली. यावर धर्मेंद्र यांनी देखील नकार दिला नाही, कारण त्यांना या गोष्टीची जाणीव होती की या चित्रपटानंतर शेखर कपूर यांना हॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळेल. 



त्यानंतर 1983 मध्ये धर्मेंद्र यांनी स्वत:चं प्रोडक्शन हाऊस सुरु केलं. ज्याचं नाव त्यांनी त्यांची लेक विजेताच्या नावावर ठेवत विजेता फिल्म्स असं ठेवलं. त्यांनी सनी देओचा 'बेताब' चित्रपट बनवला. त्यानंतर देओल कुटुंब हे राजकुमार संतोषी यांच्याकडे गेले. त्यानंतर त्यांनी ट्विंकल आणि बॉबी देओलच्या या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. या चित्रपटाचं नाव 'बरसात' असं आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान. सनी देओल त्याचा लहाण भाऊ बॉबीवर लक्ष ठेवून होता. भावासाठी सनीनं एक वर्ष दुसरं काही काम केलं नाही. 


हेही वाचा : VIDEO : विजय अन् रश्मिकाचं रिलेशनशिप कन्फर्म! रणबीरने सर्वांसमोर खुलासा केल्यानंतर लाजली 'श्रीवल्ली'


भावाचा इन्ट्रोडक्शन सीन खूप चांगला आणि सगळ्यांच्या लक्षात राहिल असा असायला हवा अशी सनी देओलची इच्छा होती. त्यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम ही युरोपला गेली. तिथे बॉबीचा वाघासोबतच्या फाईटचा सीन शूट करण्यात आला. तो सीन अप्रतिम शूट झाला. त्यानंतर दुसऱ्या लोकेशनवर त्यांना पुढचा सीन शूट करायचा होता. बॉबीचा हा सीन घोड्यावरचा होता. बॉबीला घोड्यावर बसवण्यात आलं, त्यानंतर अचानक घोड्यानं दुसऱ्या घोड्याला टक्कर मारली आणि बॉबी खाली पडला. त्याला खूप दुखावत झाली होती. त्याच्या पायाचं हाडं मोडलं, दोनवेळा पायाचं ऑपरेशन देखील झालं. त्याच्या पायाला सपोर्ट मिळावा म्हणून त्याच्या पायात रॉड देखील घालण्यात आला. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात होता. इतकंच नाही तर जेव्हा त्याला बेस्ट डेब्यू मेल फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. पण तो पुरस्कार सोहळ्यात जाऊ शकला नाही. त्यामुळे आयोजक त्याचा पुरस्कार घेऊन रुग्णालयात आले होते.