मुंबई : बॉलिवूडमध्ये कोणाचे सूत कधी कोणाला जूळेल हे सांगता येत नाही. बॉलिवूडचा ढाई किलोचा हाथ आता कमळासह जोडला गेला आहे. संरक्षण मंत्री निर्मला सितारमन आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितित अभिनेता सनी देओलला उमेदवारी देण्यात आली आहे. सनी देओल पंजाबच्या गुरुदासपूरहून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढणार आहे. याचदरम्यान अभिनेता सनी देओलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद मोदींनी त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडिच्या मध्यमातून शेअर केला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी या भेटीचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी सनीचे कौतुक केले आहे. ते म्हणाले 'सनीने माझ्या डोक्यात आणि मनात घर केले आहे. देशाला अव्वल स्थानी पोहोचवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. गुरुदासपूरहून त्यांच्या निजयाची अपेक्षा करत आहोत. आम्ही दोघे गोष्टीवरठाम आहोत, 'हिन्दुस्तान जिंदाबाद था, है, और रहेगा!' 


देशभरात चौथ्या टप्प्यातील मतदान मोठ्या उत्साहात पार पडत आहे. मतदान सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मतदारांना जास्तीत-जास्त मतदान करण्याचे आवाहन केले. निवडणुकीत ३३ हजार ३१४ मतदान केंद्रे आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक लाख ६६ हजार अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.