Sunny Deol and Amrita Singh Dimple Kapadia: आपल्या आयुष्यात असं काही होईलच असं नाही. म्हणजे आपल्या दोन एक्स-गर्लफ्रेंड्स या एकाच वेळी समोरासमोर येतील परंतु बॉलिवूडमध्ये हे क्वचितच दिसणार नाही. आजकाल ते बऱ्याचदा पाहायला मिळतं. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे सनी देओलची. काही दिवसांपुर्वी सनी देओल आणि डिंपल कपाडिया या दोघींचीही चर्चा रंगलेली होती. त्यावेळी 'गदर 2' आणि 'OMG 2' हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यामुळे नाही म्हटलं तरी डिंपल कपाडिया हिचे या दोन्ही चित्रपटांशी खास नातं होते. आपल्या जावयाचा OMG 2 हा चित्रपट आणि सनी देओलसोबत अनेकदा रिलेशनशिपची चर्चा रंगलेली असताना Gadar 2 हा चित्रपट, तेव्हा नक्की डिंपल कपाडिया कुठला चित्रपट पाहायला जाणार याचीही जोरात चर्चा रंगलेली होती. तेव्हा सोशल मीडियावर डिंपलनं आपल्या जावयाच्या चित्रपटाला बगल देत Gadar 2 ची निवड केली होती असे समजले होते. तोच सनी देओल आणि डिंपल कपाडिया हे दोघं अनेकदा स्पॉटही झाले होते. हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी चर्चा आहे ती म्हणजे डिंपल कपाडिया, अमृता सिंगसोबत सनी देओल दिसला याची. तेव्हा नक्की ते तिघं कुठल्या कारणासाठी स्पॉट झाले आहेत याची सध्या इंटरनेटवर जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. कुठल्या नव्या चित्रपटासाठी एकत्र येतायत की काहीतरी त्यांच्यात वेगळंच शिजतंय की काहीतरी गडबड आहे याची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 'विरल भयानी' या इन्टाग्राम पेजवरून त्या तिघांचा एक फोटो यावेळी शेअर करण्यात आला आहे. ज्यातून त्या तिघांची चांगली चर्चा रंगलेली दिसते आहे. 


डिंपल कपाडिया आणि सनी देओल


काही वर्षांपुर्वी सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी ते दोघं हे एकमेकांना डेट करत आहेत का याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यावेळी फोटोत स्पष्ट दिसत होते की ते दोघं हे एकमेकांचे हात धरून आहेत आणि एकमेकांच्या जवळ बसले आहेत. यातून त्यांचे अफेअर चालूच होते असं सांगता येणार नाही. 



अमृता सिंग आणि सनी देओल 


अमृता सिंग आणि सनी देओल यांची ओळख ही 'बेताब' या चित्रपटानंतर वाढू लागली होती. त्यांच्यात चांगलीच चर्चा रंगलेली होती. याच चित्रपटानंतर त्यांच्यातील जवळीक वाढू लागली होती. परंतु नंतर त्यांचे नाते काही फार काळ टिकले नाही.