Viral Video: शाहरुख समोर येताच दिसले सनीच्या मुलगा-सुनेचे संस्कार; सर्वत्र होतेय कौतुक
Sunny Deol Son and Shahrukh Khan: सध्या शाहरूख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर हा चांगलाच व्हायरल होतो आहे. यावेळी त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. कारण सनी देओलचा मुलगा आणि त्याची सून हे चक्क पाया पडले आहेत.
Gadar 2 : सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे 'गदर 2' या चित्रपटाची. या चित्रपटानं फारच थोड्या काळात कोट्यवधींची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट हिंदीतला सर्वात लोकप्रिय असा चित्रपट आणि बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक घौडदौड करणारा चित्रपट ठरला आहे. त्यामुळे या चित्रपटाची सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे. या चित्रपटाची नुकतीच सेक्सेस पार्टीही झाली आहे. या चित्रपटाच्या सेक्सेस पार्टीला अख्ख्या बॉलिवूडनं हजेरी लावली होती. यावेळी शाहरूख खानही उपस्थित होता. त्यामुळे त्याचीही चांगलीच चर्चा रंगलेली होती.
यातच आता चर्चा होती ती म्हणजे सनी देओलचा मुलगा आणि सुनं हे शाहरूख खानच्या पाया पडले होते. त्यांचे या वर्षीच्या जून महिन्यात लग्न झाले आहे. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा होती. आपले लग्न झाले त्या निमित्तानं मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्यातूनच आपल्या संस्कारांचेही दर्शन होताना दिसते. यावेळी नुकतंच लग्न झालेल्या या जोडप्यानं शाहरूख खानचे आशीर्वाद घेतले आहेत. यावेळी त्यांनी शाहरूखचे पाया पडून आशीर्वाद घेतले आहेत.
यावेळी शाहरूखचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात सनी देओलचा मुलगा आणि सुन हे चक्क शाहरूखच्या पाया पडताना दिसत आहेत. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी शाहरूख खान हा गदर 2 च्या सेक्सेस पार्टीला पोहचला होता. तेव्हा सनी देओलच्या मुलानं आणि सुनेनं चक्क त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. यावेशी त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली होती. यावेळी त्या दोघांनीही केलेलं हे कृत्य पाहून सगळेच त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. यावेळी सर्वात जास्त चर्चा होती ते म्हणजे शाहरूखनं दाखवलेल्या आपलेपणाची. त्याचे नेटकरी फार कौतुक करत आहेत.
हेही वाचा : 'शाहरूख बेटे...' धर्मेंद्र यांनी 'जवान'निमित्त शाहरूखचे 'या' तीन शब्दात केले कौतुक
यावेळी नेटकऱ्यांनीही सनी देओलच्या मुलाचे करण देओलचे आणि सुनेचे कौतुक केले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतो आहे. यावेळी शाहरूखकडून आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी शाहरूख सोबत फोटोही काढले होते. त्यातून शाहरूखनं दाखवलेला हा मोठेपणा पाहून सर्वच जण त्याचे कौतुक करत आहेत. याखेरीज आता चर्चा आहे ती म्हणजे नेटकरी त्या दोघांनाही त्यांच्यावर चांगले संस्कार केले आहेत असंही म्हणत आहेत.
सध्या हा व्हिडीओ हा सर्वत्र चर्चेत आहे किंबहुना यावर नेटकरी कौतुकाचाच वर्षाव करत आहेत.